
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, नवी दिल्ली, दि. 21 : पंतप्रधान नरेंद्र मोदी हे खरं तर सरेंडर मोदी आहेत, त्यांनी चीनसमोर शरणागती पत्करली, असा आरोप काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी केला आहे.
त्यांनी ट्वीट करून जपान टाईम्सच्या वेबसाईटवरची बातमी शेअर करत हा आरोप केला आहे.
गलवान खोरे प्रकरण आणि भारत चीन तणावानंतर गेल्या काही दिवसांत काँग्रेस नेते राहुल गांधी नरेंद्र मोदींवर वारंवार टीका करताना दिसत आहेत.
याआधी, चीनचे सैनिक भारतात घुसलेच नाहीत, या पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वक्तव्याचा काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी समाचार घेतला होता. पंतप्रधान मोदींनी चीनला आपली जमीन स्वाधीन केली, असं राहुल यांनी ट्वीट करून म्हटलं आहे.
जर जमीन चीनची होती तर मग आपल्या सैनिकांनी जीव का गमावला? हे सगळं कुठे घडलं? असा सवाल राहुल गांधी यांनी केला आहे.
