नगर जिल्ह्यातील कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य । दि. ०४ नोव्हेंबर २०२२ । मुंबई । भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष मा. चंद्रशेखर बावनकुळे यांच्या उपस्थितीत अहमदनगर जिल्ह्यातील युवा नेते महेश झोडगे, गणेगावचे सरपंच अमोल भनगडे, नागरदेवीचे सरपंच राम पानमखकर, पंचायत समिती सदस्य सोनू भुजबळ, भागचंद तागडकर, संदीप जाधव, दत्ता फुलारी, मयूर सोनवणे यांच्यासह असंख्य ग्रामपंचायत सदस्य व कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

माजी आमदार शिवाजी कर्डीले यांच्या पुढाकाराने हा पक्षप्रवेश झाला. यावेळी भाजपा प्रदेश उपाध्यक्ष राम शिंदे, प्रदेश सरचिटणीस विक्रांत पाटील, माजी आमदार स्नेहलताताई कोल्हे यांच्यासह भाजपा पदाधिकारी उपस्थित होते.

भाजपा प्रदेश कार्यालयात झालेल्या पक्षप्रवेश कार्यक्रमात मा. प्रदेशाध्यक्षांनी या कार्यकर्त्यांचे स्वागत केले व त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!