दैनिक स्थैर्य | दि. २६ ऑगस्ट २०२३ | फलटण |
कालिया नागाचा पराभव करून यमुना नदी पात्रातून भगवान श्रीकृष्ण सुखरुप बाहेर पडले, तो दिवस म्हणून ‘नागपंचमी’ सणाला विशेष महत्त्व आहे, त्याचबरोबर व्रतवैकल्याचा महिना, श्रावण महिन्यातील महिलांचा पहिलाच सण म्हणून नागपंचमी सणाला वेगळे महत्त्व असल्याचे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून दिले.
शनिनगर नागपंचमी उत्सव मंडळ आणि योद्धा ग्रुप फलटण यांच्या संयुक्त सहभागाने प्रतिवर्षीप्रमाणे यावर्षीही बाणगंगा नदीपात्रातील शनि मंदिर परिसरात पारंपरिक नागपंचमी उत्सव, फक्त महिलांकरीता ‘जल्लोष’ या उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. पारंपरिक खेळ, झिम्मा, फुगडी, गाणी यांसह महिलांनी धरलेले फेर व अन्य उपक्रमांसह संगीताच्या तालावर ठेका धरून हा सण महिलांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. त्यावेळी श्रीमंत सौ.शिवांजलीराजे नाईक निंबाळकर बोलत होत्या.
यावेळी माजी नगराध्यक्षा सौ. नीता मिलिंद नेवसे, माजी नगराध्यक्षा श्रीमती विद्या गायकवाड, लायन्स क्लब फलटण प्लॅटिनमच्या अध्यक्षा सौ. वैशाली चोरमले, सौ. प्रगती कापसे, सौ. दिपाली निंबाळकर, सौ. सुवर्णा खानविलकर, सौ. वैशाली अहिवळे, सौ. ज्योत्स्ना शिरतोडे, सौ. रेश्मा शेख, सौ. संगिता शिंदे, मार्केट कमिटी संचालिका सौ. जयश्री सस्ते, सौ. सरलादेवी घोरपडे, सौ. धनश्री घोरपडे, सौ. कोमल शिंदे, महावीरशेठ सराफ पेढीच्या सौ. मेघा गांधी, सौ. संध्या राऊत, सौ. भारती ननावरे यांच्यासह फलटण शहर व परिसरातील हजारो महिला उपस्थित होत्या.
नागपंचमी उत्सवाला वेगळे आध्यात्मिक व सांस्कृतिक महत्त्व असून या दिवशी अनंत, शेष, पद्मनाभ, तक्षक, कालिया वगैरे ८ नाग देवतांची पूजा केली जाते. शंभू महादेवाच्या प्रतिकांपैकी एक तसेच भगवान विष्णूचे प्रतिक म्हणूनही नागाकडे पाहिले जात असल्याचे निदर्शनास आणून देत या सणासाठी नवीन लग्न झालेल्या मुली माहेरी येतात, त्याही या सणाच्या निमित्ताने आयोजित पारंपरिक खेळांमध्ये मोठ्या उत्साहाने आपल्या मैत्रिणींसमवेत सहभागी होत असल्याचे श्रीमंत सौ. शिवांजलीराजे नाईक निंबाळकर यांनी निदर्शनास आणून देत उपस्थित महिलांना नागपंचमी सणाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्या. प्रारंभी नागदेवतेची विधीवत पूजा श्रीमंत सौ. शिवांजलीराजे संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आली.
महोत्सवादरम्यान संयोजकांच्या वतीने संगीत खुर्ची स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. त्यामध्ये पहिले ११ क्रमांक काढण्यात आले. या सर्वांना पू. ना. गाडगीळ अॅण्ड सन्स लि., महावीरशेठ सराफ पेढी आणि हिरण्याज कलेक्शन यांच्यावतीने आकर्षक बक्षिसे देण्यात आली. त्यामध्ये प्रथम क्रमांक व मानाच्या पैठणीचा बहुमान स्नेहा विकास जाधव यांनी मिळविला. या स्पर्धेमधील उर्वरित विजेत्या महिला स्पर्धक सोनल सूरज भोसले, स्नेहा रूपेश माने, जयश्री ढालपे, रेखा अहिवळे, सुजाता नारायणकर, उज्ज्वला किरण जाधव, रश्मी मारवाडी, ज्योती राहुल कुंभार, कुसूम महामुनी, रोहिणी सूरज कचरे यांनी आकर्षक गृहोपयोगी वस्तूंची बक्षिसे मिळविली.
कार्यक्रमाचे आयोजन माजी नगरसेविका सौ. प्रगती कापसे, सौ. अमृता किशोरसिंह नाईक निंबाळकर, सौ. मंदा बाळासाहेब जानकर, सौ. रेश्मा शेख, सौ. पल्लवी धायगुडे, सौ. राणी भाचकर, सौ. अनिषा डोंबाळे, सौ. ऐश्वर्या चमचे, सौ. शितल निंबाळकर, सौ. रूपाली धायगुडे, सौ. शोभा शिंदे यांनी केले होते.
सदरील कार्यक्रमास खंबीर साथ देत बाळासाहेब अमृतराव जानकर, अभिजीत जानकर, पै. पप्पूभाई शेख, ओमकार गाढवे, अवधूत कदम, शेखर रेळेकर, रोहित शिंदे, प्रणव चमचे, सचिन कोरे, निलेश शशिकांत शिंदे, हरिष जाधव, ओंकार पवार, प्रथमेश आंबेकर, जित पवार, वरुण अब्दागिरे, यश धायगुडे, यश कदम, मयूर मारुडा, भूषण कापसे, राज धायगुडे, आदित्य शिंदे, हर्षद कोरे, अभिजीत निंबाळकर, सचिन नाईक, निलेश पवार, विनोद निंबाळकर, निलेश बाळासो शिंदे, राम पवार, अविनाश धायगुडे, गणेश धायगुडे, सनी आंबेकर, अजय शिंदे, आशुतोष केंजळे, आकाश राजमाने, दिनेश कर्वे, संतोष कर्वे, गणेश कर्वे, विशाल कर्वे, शुभम देशमाने, ओंकार दळवी यांनी या महोत्सवाचे नियोजन उत्तम केले होते. सूत्रसंचालन सौ. राजश्री शिंदे व सनी पवार यांनी केले.