संगीत क्षेत्रातील दिग्गजाचे निधन : राजन-नागेंद्र जोडीतील राजन यांचे निधन


 

स्थैर्य, दि.१२: कन्नड चित्रपटसृष्टीतील दिग्गज संगीतकार राजन-नागेंद्र जोडीतील राजन यांचे निधन झाले आहे. 87 वर्षीय राजन यांनी रविवारी संध्याकाळी आपल्या बंगळूरु येथील निवासस्थानी अखेरचा श्वास घेतला. जवळपास 20 वर्षांपूर्वी राजन यांनी त्यांचे धाकटे बंधू नागेंद्र यांना गमावले होते. वृत्तानुसार, राजन-नागेंद्र हिंदी चित्रपटसृष्टीतील प्रसिद्ध जोडी शंकर-जयकिशन, लक्ष्मीकांत-प्यारेलाल आणि कल्याणजी-आनंदजी या वर्गातील संगीतकार होते. त्यांना कन्नड चित्रपटांचे कल्याणजी-आनंदजी म्हणून ओळखले जाते.

दोन दिवसांपूर्वीपर्यंत संगीताचे वर्ग घेत होते

एका इंग्रजी न्यूज वेबसाईटशी बोलताना राजन यांचा मुलगा आर अनंत कुमार म्हणाले, “ते खूप स्वस्थ होते आणि ऑनलाईन म्युझिकचे वर्ग घेत होते. गेल्या दोन दिवसांपासून त्यांना अपचनाचा त्रास सुरु झाला होता. रविवारी रात्री अकराच्या सुमारास त्यांनी घरी अखेरचा श्वास घेतला.”

सुमारे 375 चित्रपटांमध्ये संगीत दिले

राजन-नागेंद्र जोडीने त्यांच्या 5 दशकांच्या दीर्घ कारकीर्दीत सुमारे 375 चित्रपटांमध्ये संगीत दिले. यातील सुमारे 200 चित्रपट कन्नड चित्रपट आहेत. बाकीचे तामिळ, तेलगू, मल्याळम, हिंदी आणि सिंहली भाषांचे चित्रपट आहेत. रिपोर्ट्सनुसार संगीत क्षेत्रात सर्वाधिक काळ कार्यरत असलेल्या संगीतकार जोडीचा रेकॉर्ड त्यांच्या नावावर आहे.

2000 मध्ये नागेंद्र यांचे निधन झाले होते

राजेंद्र यांचे धाकटे भाऊ नागेंद्र यांचे 4 नोव्हेंबर 2000 रोजी बंगळुरू येथे निधन झाले होते. त्यांच्यावर हर्नियावर उपचार सुरू होते. परंतु नंतर त्यांना रक्तदाब, मधुमेह यासारख्या समस्या सुरु झाल्या आणि त्यातच त्यांचे निधन झाले.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!