सैन्यदलातील जवानाचा कुटुंबियांकडूनच खून 


स्थैर्य, सातारा, दि. १: सैन्यदलात नोकरीस जवान सैदापूर, ता. सातारा येथे गावी आल्यानंतर दि. 27 डिसेंबर रोजी त्याचा दांडक्याने मारहाण खून झाला होता. या खुनाची माहिती मिळताच स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने 4 तासात छडा लावला. हा खुन मृत सैनिकाची पत्नी, भावजय आणि मेव्हण्याने केला असल्याचे तपासात समोर आले आहे. सुट्टीला गावी आल्यानंतर दारू पिवून त्रास देत असल्याने खून केल्याची कबुली संशयितांनी पोलिसांजवळ दिली आहे.
याबाबत माहिती अशी, संदीप जयसिंग पवार, रा. सैदापूर, ता. सातारा हा भारतीय सैन्यदलात नोकरीस असणारा जवान गावी सुटटीवर आला असताना 27 डिसेंबर रोजी सायंकाळी 6च्या सुमारास त्याला दांडक्याने मारहाण करण्यात आली. यात तो जबर जखमी झाला होता. त्यास त्याची पत्नी व नातेवाईकांनी कमांड हॉस्पीटल, पुणे येथे औषधोपचारकामी दाखल केले होते. मात्र, दाखल केल्यानंतर थोडयाच वेळात तो मयत झाला होता. याबाबत त्यास मारहाण करुन त्याच्या मृत्युस कारणीभुत होणार्‍या अज्ञात इसमांविरुध्द त्याचे पत्नीने वानवडी पोलीस स्टेशन, पुणे शहर येथे फिर्याद दिली होती.
पुणे शहर पोलिसांनी दि. 31 रोजी याची माहिती जिल्हा पोलीस अधीक्षक अजयकुमार बंसल यांना दिली. त्यानंतर सातारा तालुका पोलीस स्टेशनमध्ये याप्रकरणी खुनाचा गुन्हा दाखल झाला. मृत भारतीय सैन्यदलातील जवान असल्याने गुन्ह्याचे गांभीर्य लक्षात घेवून पोलीस अधीक्षक बन्सल यांनी एलसीबीचे पोनि किशोर धुमाळ यांना गुन्ह्याचा छडा लावण्याच्या सुचना दिल्या. पोनि किशोर धुमाळ यांनी स्थानिक गुन्हे शाखेचे सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे व पोलीस अंमलदार यांचे पथक तयार करुन त्यांना योग्य त्या सुचना दिल्या. स.पो.नि. रमेश गर्जे व पथकाने गुन्ह्याच्या ठिकाणी भेट देवून, मृताच्या घरातील लोक, नातेवाईक, गावातील आजुबाजुचे लोक यांचेकडे चौकशी केली. दरम्यान, घरातील लोक माहिती लपवत असल्याचे व उडवाउडवीची उत्तरे देत असल्याचे दिसून आले. त्यामुळे त्यांच्यावर संशय आल्याने गोपनीय माहिती घेवून व घरातील लोक व नातेवाईकांना ताब्यात घेवून त्यांच्याकडे कसून चौकशी केली. यावेळी मृत संदीप पवार यांच्या खुनामध्ये त्यांची पत्नी, भावजय व मेव्हणा यांचा सहभाग असल्याचे निष्पन्न झाले. त्यांनी मृत संदीप पवार सुट्टीवर आल्यावर दारू पिऊन घरातील लोकांना शिवीगाळ, मारहाण करुन त्रास देत असायचे. या त्रासाला कंटाळुन त्यांस 27 डिसेंबर रोजी सायंकाळी घरात लाकडी दांडक्याने मारहाण केली. पोलिसांना संशय येवु नये, म्हणून सातारा येथे अ‍ॅडमिट न करता कमांड हॉस्पीटल पुणे येथे अ‍ॅडमिट केल्याचे व वानवडी पोलीस स्टेशन येथे अज्ञात आरोपींविरुध्द खोटी फिर्याद दिल्याची संशयितांनी कबुली दिली.
ही कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक धीरज पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ, सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे, पोलीस अंमलदार सफो जोतिराम बर्गे, पोहवा अतिश घाडगे, संजय शिर्के, विजय कांबळे, संतोष पवार, शरद बेबले, प्रवीण फडतरे, प्रमोद सावंत, अजित कर्णे, अर्जुन शिरतोडे, निलेश काटकर, गणेश कापरे, रोहित निकम, सचिन ससाणे, वैभव सावंत, चालक पोना संजय जाधव यांनी सहभाग घेतला.
आरोपिंची नावे: १ ) सोमनाथ भरत आंबवले वय २ ९ वर्षे रा . खोलवूड़ी ता.वाई जि . सातारा २ ) चेतना संदीप पवार वय ३५ वर्षे रा . सैदापुर ता . जि . सातारा ३ ) सुषमा राहुल पवार वय ३८ वर्षे रा . ३४/३५ यादोगोपाळ पेठ सातारा.

Back to top button
Don`t copy text!