दारु पिवून छोटा हत्ती चालवल्याप्रकरणी वाई पोलिसात गुन्हा दाखल

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›
स्थैर्य, वाई, दि.२: 31 डिसेंबरच्या रात्री वाई पोलिसांचा कडेकोट बंदोबस्त होता. अशाही बंदोबस्तात काही महाशय दारुची पार्टी करताना दिसत होते. त्यांच्यावर वाई पोलिसांनी कारवाई केली आहे. त्यामध्ये जावली तालुक्यातील पार्टेवाडी येथील सुशांत तुळशीदास पार्टे(वय 24) हा दारु पिवून छोटा हत्ती चालवत असल्याचे आढळून आल्याने त्याच्यावर वाई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
वाई पोलिसांनी दिलेली माहिती अशी, की 31 डिसेंबरच्या अनुषंगाने रात्री गस्त सुरु असताना रात्री पावणे नऊ वाजण्याच्या सुमारास वाई ते मांढरदेव जाणाऱया रस्त्यावर चाँदणी चौकात नशेत तऱह होवून सुशांत पार्टे हा त्याच्याजवळील छोटा हत्ती एमएच11सीएच8248 चालवत निघाला होता. पोलिसांच्या निदर्शनास येताच त्यास रोखले. त्याने मध्यपान केल्याचे निदर्शनास येताच त्याच्यावर मोटर वाहन कायदा कलम 185 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!