मुंबई – बंगळुरु महामार्गावर पुण्यातील नवले ब्रिजजवळ भीषण अपघात, 8 ते 10 गाड्या एकमेकांवर धडकल्या; काही जण गंभीर जखमी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

 

स्थैर्य, पुणे, दि.६: मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलाजवळ मंगळवारी सकाळी भीषण अपघात झाला. सकाळी 11 वाजेच्या सुमारास झालेल्या या अपघातात ब्रेक निकामी झालेल्या ट्रकने 8-10 गाड्यांना चिरडले असल्याची माहिती मिळाली आहे. या अपघातात काही जण गंभीर जखमी असल्याचेही वृत्त आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली होती.

मंगळवारी सकाळी मुंबई-बंगळुरु महामार्गावरील नवले पुलावरुन देहुरोडच्या दिशेने एक ट्रक भरधाव वेगाने येत होता. त्याचवेळी ट्रकचा ब्रेक निकामी झाल्याने चालकाचे ट्रकवरील नियंत्रण सुटले. नंतर या भरधाव ट्रकने रस्त्यावरुन जाणाऱ्या 8 ते 10 दुचाकींना उडवले. या विचित्र अपघातात अनेक जण जखमी झाले आहेत.

एकाच वेळी एवढ्या गाड्यांचा अपघात झाल्याने एकच गोंधळ उडाला असल्याचे चित्र पाहायला मिळाले. अपघातीत लोकांची आपला जीव वाचवण्यासाठी धावाधाव सुरू झाली. रस्त्याने जात असणारे नागरिक आपला जीव वाचवण्यासाठी धावत होते. यामुळे जखमी लोकांना गाडीतून लवकर बाहेर काढता आले नाही. दरम्यान यामध्ये अनेक जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.

हे देखील वाचा

प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
कॉपी करू नका..!