
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
स्थैर्य, फलटण, दि. ०१ : विधानपरिषद सभापती ना. श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांचे स्वीय सहाय्यक मुकुंद रणवरे (काका) यांची निंभोरे गावच्या उपसरपंचपदी निवड झाली असून या निवडीनंतर त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. महाराष्ट्र विधानपरिषद सभापतीचें सचिव म.मु काज, ओएसडी संजय खानोरकर यांच्यासह महाराष्ट्र विधान भवन मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांनी मुकुंद रणवरे (काका) यांची निंभोरे गावच्या उपसरपंच पदी निवड झाल्याबद्दल विधान भवन मुंबई येथे यथोचित सत्कार करून अभिनंदन केले व पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.
