बारावी परीक्षेसाठी मुधोजी हायस्कूल फलटण विज्ञान शाखा केंद्राची बैठक व्यवस्था

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ९ फेब्रुवारी २०२५ | फलटण |
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळ कोल्हापूर विभागाच्या एच.एस.सी. बोर्ड परीक्षा फेब्रुवारी / मार्च २०२५ ची मुधोजी हायस्कूल व ज्युनि. कॉलेज फलटण केंद्र क्र. ०१०१ येथे विज्ञान शाखेची परीक्षा ११ फेब्रुवारी २०२५ पासून सुरू होत आहे. मुधोजी हायस्कूल फलटण येथे विज्ञान शाखेच्या X०१३१६८ ते X०१४००० या विद्यार्थ्यांची बैठक व्यवस्था केलेली आहे.

विद्यार्थ्याने केंद्रावर बोर्डाने प्रकाशित केलेल्या अधिकृत वेळापत्रकाप्रमाणे प्रवेश पत्र (रिसीट), ओळखपत्र व लेखनसाहित्य घेऊन शालेय गणवेशात वेळेपूर्वी अर्धा तास अगोदर उपस्थित रहावे. उशिरा येणार्‍या विद्यार्थ्यास परीक्षा कक्षात प्रवेश दिला जाणार नाही.

विद्यार्थ्यांने परीक्षा केंद्राच्या आवारात भ्रमनध्वनी (मोबाईल), टॅबलेट, इलेक्ट्रॉनिक घड्याळ, पॉकेट कॅलक्युलेटर वा तत्सम इलेक्ट्रॉनिक साधने / उपकरण परीक्षा केंद्रावर बाळगण्यास सक्त मनाई आहे.

विद्यार्थ्याने कोणत्याही गैरमार्गाचा अवलंब न करता कॉपीमुक्त वातावरणात निर्भयपणे परीक्षा द्यावी. तसेच परीक्षा व्यवस्थितपणे पारपाडण्यासाठी विद्यार्थी व पालकांनी सहकार्य करावे, असे आवाहन प्राचार्य श्री. शेडगे व्ही. के., केंद्रप्रमुख श्री. माने एस. एस., माध्यमिक विभागाचे उपप्राचार्य श्री. जगताप एन. एम., पर्यवेक्षिका सौ. पाटील पी.व् ही. यांनी केले आहे.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!