कृषी महाविद्यालयात ग्रामीण कृषी जागरूकता आणि औद्योगिक जोड कार्यक्रम सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

फलटण कृषी महाविद्यालयात शैक्षणिक वर्ष २०२६-२७ मधील आठव्या सत्राच्या विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रमाचा अभिमुखता कार्यक्रम पार पडला.

स्थैर्य, फलटण, दि. २९ ऑक्टोबर : महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी संलग्नित फलटण एज्युकेशन सोसायटी संचलित कृषी महाविद्यालय, फलटण येथे पदवीच्या आठव्या सत्रातील विद्यार्थ्यांसाठी ग्रामीण कृषी जागरूकता कार्यानुभव व कृषी औद्योगिक जोड कार्यक्रम अभ्यासक्रमाचा अभिमुखता कार्यक्रम प्राचार्य यू. डी. चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला.

कार्यक्रमाची रूपरेषा व मार्गदर्शन

या अभ्यासक्रमांतर्गत कृषी अवलोकन, सस्यशास्त्र, उद्यानविद्या, वनस्पती रोगशास्त्र, कीटकशास्त्र, कृषी अभियांत्रिकी, वनस्पतिशास्त्र, मृदशास्त्र, अर्थशास्त्र आणि कृषी विस्तार या सर्व विभागांतील विषयतज्ज्ञांच्या मार्गदर्शनाखाली प्रात्यक्षिके आयोजित केली जातात. यासाठी महाविद्यामार्फत विद्यार्थ्यांना गावे निवडून दिली जातात. यामध्ये कृषी संशोधन व संस्था अवलोकन, वनस्पती चिकित्सालय अवलोकन आणि कृषी औद्योगिक जोड अवलोकन यांसारख्या अभ्यासक्रमांचा समावेश आहे.

विद्यार्थ्यांनी घ्यायची काळजी

अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य यू. डी. चव्हाण यांनी विद्यार्थ्यांनी बी.एस्सी. कृषी पदवीमधील तांत्रिक व शास्त्रोक्त माहिती ग्रामीण भागातील शेतकऱ्यांपर्यंत पोहोचवावी, असे सांगितले. परिसरातील शेतकरी, महिला बचत गट आणि सुशिक्षित बेरोजगार तरुणांना मार्गदर्शन व जनजागृती करून शेतकऱ्यांच्या शंकांचे निरसन करावे, असे आवाहन त्यांनी केले. कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन समन्वयक एन. एस. धालपे यांनी केले, तर आभार प्रदर्शनही त्यांनीच मानले.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!