
थेट WhatsApp वर मिळवा
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त मुधोजी महाविद्यालयात १५ ऑक्टोबर रोजी विशेष व्याख्यान पार पडणार आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : फलटण एज्युकेशन सोसायटीचे मुधोजी महाविद्यालय, येथील मराठी पदवी व पदव्युत्तर मराठी विभाग आणि विवेकवाहिनी यांच्या संयुक्त विद्यमाने भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त ‘वाचन प्रेरणा दिन’ निमित्त विशेष व्याख्यान कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. हा कार्यक्रम १५ ऑक्टोबर रोजी सकाळी १० वाजता महाविद्यालयातील प्राचार्य शिवाजीराव भोसले सभागृहात पार पडणार आहे.
विद्यार्थ्यांमध्ये वाचनाची आवड निर्माण व्हावी हा उद्देश
भारतरत्न डॉ. ए. पी. जे. अब्दुल कलाम यांच्या जीवनकार्यातून आणि विचारांतून विद्यार्थ्यांना वाचनाची प्रेरणा मिळावी, या उद्देशाने या विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाच्या प्रमुख वक्त्या म्हणून प्रा. डॉ. सीता जगताप मार्गदर्शन करणार असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य प्रा. डॉ. पी. एच. कदम असणार आहेत.
उपस्थित राहण्याचे आवाहन
या कार्यक्रमाचे समन्वयक म्हणून प्रा. डॉ. प्रभाकर पवार व प्रा. डॉ. अशोक शिंदे काम पाहत असून प्रा. शैला क्षीरसागर व डॉ. गौरी गायकवाड सहसंयोजक आहेत. या व्याख्यानास महाविद्यालयीन विद्यार्थी, प्राध्यापक व नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे, असे आवाहन मुधोजी महाविद्यालयाच्या वतीने करण्यात आले आहे.





