मुधोजी महाविद्यालयास खो-खो स्पर्धेचे उपविजेतेपद

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

दैनिक स्थैर्य | दि. ७ ऑक्टोबर २०२३ | फलटण |
वेणूताई चव्हाण कॉलेज, कराड येथे संपन्न झालेल्या सातारा विभागीय खो-खो महिला स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयास उपविजेतेपद मिळाले. बादफेरीच्या स्पर्धेमध्ये मुधोजी महाविद्यालयाने डी.पी.भोसले कॉलेज कोरेगाव, शासकीय इंजिनिअरिंग महाविद्यालय कराड, कला महाविद्यालय नागठाणे या संघावर विजय मिळवत अंतिम फेरी गाठली. अंतिम सामन्यांमध्ये अतितटीच्या सामन्यामध्ये एस. जी. एम. कॉलेज कराड यांच्याकडून हार पत्करावी लागली व उपविजेतेपद मिळाले.

या संघामध्ये पूजा फडतरे, साक्षी कुंभार, मुस्कान नगरजी, वर्षा यादव, तुळसा शिंदे, कोमल शिंदे, विशाखा पवार, वैष्णवी खलाटे या खेळाडूंनी उत्कृष्ट खेळाचे प्रदर्शन करून सर्व प्रेक्षकांची मने जिंकली.

फलटण एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, चेअरमन श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर, सेक्रेटरी श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, संस्थेचे प्रशासन अधिकारी श्री. अरविंद निकम सर तसेच मुधोजी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. पी. एच. कदम सर यांनी सर्व संघाचे अभिनंदन केले व पुढील स्पर्धेसाठी हार्दिक शुभेच्छा दिल्या.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!