एसटी महामंडळात १३,९८० जागांवर मेगा भरती; चालक आणि मेकॅनिक पदांसाठी सुवर्णसंधी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

राज्यातील सरकारी नोकरीच्या प्रतीक्षेत असलेल्या सुशिक्षित तरुणांसाठी एक अत्यंत आनंदाची बातमी समोर आली असून, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळात (MSRTC) तब्बल १३,९८० रिक्त पदांवर भरती जाहीर करण्यात आली आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १४ नोव्हेंबर : एसटी महामंडळात प्रवाशांच्या सोयीसाठी आणि बसेसच्या सुरळीत संचालनासाठी चालक (Driver) आणि मेकॅनिक (Mechanic) यांसारख्या महत्त्वाच्या संवर्गातील तब्बल १३,९८० जागांवर मेगा भरती राबवली जाणार आहे. परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्यानंतर आणि शासनाच्या निर्देशानुसार ही भरती प्रक्रिया पार पडणार असून, यामुळे राज्यभरातील बेरोजगार तरुणांना मोठा दिलासा मिळाला आहे.

कोणत्या पदांसाठी होणार भरती?

या विशेष भरती मोहिमेत प्रामुख्याने वाहन चालक सह वाहक आणि विविध तांत्रिक पदांव्यतिरिक्त मेकॅनिक, इलेक्ट्रीशियन व इतर तांत्रिक विभागातील रिक्त जागा भरल्या जाणार आहेत. महामंडळातील कर्मचाऱ्यांचा ताण कमी करणे आणि प्रवाशांना अधिक दर्जेदार सेवा देणे हा या भरतीचा मुख्य उद्देश आहे. पात्र उमेदवारांना ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा लवकरच उपलब्ध करून दिली जाणार असून, उच्च शिक्षितांसह आईटीआई (ITI) धारकांसाठी ही एक सुवर्णसंधी ठरणार आहे.

शैक्षणिक पात्रता आणि अर्ज प्रक्रिया

या भरतीसाठी अर्ज करू इच्छिणाऱ्या उमेदवारांना पदानुसार १० वी, १२ वी किंवा संबंधित ट्रेडमध्ये आयटीआय (ITI) उत्तीर्ण असणे आवश्यक असणार आहे. तसेच वाहन चालकांसाठी योग्य त्या अनुभवासह वैध वाहन परवाना (Driving Licence) असणे बंधनकारक आहे. लवकरच एसटी महामंडळा

MSRTC च्या अधिकृत संकेतस्थळावर यासंदर्भातील सविस्तर जाहिरात प्रसिद्ध केली जाईल, ज्यामध्ये वयोमर्यादा, अर्ज करण्याची अंतिम तारीख आणि परीक्षेचे स्वरूप याविषयीची सविस्तर माहिती दिली जाईल.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!