
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य, सस्तेवाडी, दि. २६: सस्तेवाडी ता. फलटण येथे राष्ट्रवादी काँग्रेस पुरस्कृत राजे गटाच्या पॅनेलला स्पष्ट मिळाले. सस्तेवाडी ग्रामपंचायतीच्या सरपंच पदी सौ. ज्ञानेश्वरी राजेंद्र कदम तर उपसरपंच पदी बापूराव सदाशिव शिरतोडे यांची बिनविरोध निवड करण्यात आलेली आहे. नवनिर्वाचित सरपंच व उपसरपंच यांचा सत्कार सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या हस्ते संपन्न झाला.
या वेळी सतीश आप्पा सस्ते, राम नाईक निंबाळकर, शंकर आण्णा जाधव, प्रकाश वाबळे, युवराज कदम, प्रमोद अहिवळे, आनंदराव चोरमले, विजय सस्ते, अविदादा सस्ते, राजू शिंदे, विकास करे, बाळासाहेब करे, बारीकराव केंजळे, दादा मदने, तुकाराम मदने, संजय जामदार, बापू राऊत, पप्पू जाधव, हर्षद वाबळे यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.
सस्तेवाडी, ता. फलटण येथे विधानपरिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर, आमदार दीपक चव्हाण, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर व सातारा जिल्हा परिषदेचे माजी अध्यक्ष व विद्यमान सदस्य श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली व सतीश सस्ते, शंकर जाधव व प्रकाश वाबळे यांच्या नेतृत्वाखाली सस्तेवाडी ग्रामपंचातीमध्ये स्पष्ट बहुमत मिळालेले आहे.
