
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
स्थैर्य,फलटण, दि. 13 नोव्हेंबर : वंचित बहुजन आघाडीच्या सौ. सपनाताई भोसले यांचा मा. खा. रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या उपस्थित भारतीय जनता पार्टी मध्ये पक्ष प्रवेश केला आहे.
यावेळी सौ. सपनाताई भोसले म्हणाल्या, माजी खासदार रणजितसिंह निंबाळकर यांच्या नेतृत्वाखाली महिला सक्षमीकरण करून अधिकाधिक महिला रोजगार उपलब्ध करणार आहे. तसेच फलटण शहरातील मुलींना आणि महिलांना संरक्षण देण्यास कटिबद्ध राहणार आहे. या निवडीबद्दल भारतीय जनता पार्टीच्या अनेक पदाधिकार्यांनी त्यांचे अभिनंदन केले. या वेळी माजी नगरसेवक सचिन अहिवळे, सुधीर अहिवळे, सौ. अनिता काकडे, सनीभाऊ मोरे, विकी बोके, महेश जगताप, सुनील अहिवळे यांच्यासह शेकडो कार्यकर्ते, महिला उपस्थित होते.



