निंभोरे ग्रामपंचायत सरपंचपदाच्या निवडणुकीत राजे गटाच्या सौ. रेखा लांडगे विजयी


दैनिक स्थैर्य | दि. १९ एप्रिल २०२४ | फलटण |
निंभोरे (ता. फलटण) ग्रामपंचायतीच्या झालेल्या सरपंचपदाच्या निवडणुकीत राजे गटाच्या सौ. रेखा लक्ष्मण लांडगे या विजयी झाल्या. त्यांना ५ मते मिळाली, तर खासदार गटाच्या वनिता संदीप अडसूळ यांना ३ मते मिळाली.

भूतपूर्व सरपंच सौ. कांचन निंबाळकर या अपात्र झाल्यामुळे रिक्त झालेल्या सरपंचपदासाठी निवडणूक घेण्यात आली होती. विजयी सरपंच सौ. रेखा लांडगे यांचे अभिनंदन आमदार दीपक चव्हाण, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष श्रीमंत संजीवराजे नाईक निंबाळकर, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती श्रीमंत रघुनाथराजे नाईक निंबाळकर यांनी केले.

यावेळी ग्रामपंचायतीचे उपसरपंच मुकूंदराव रणवरे, सदस्य नितीन मदने, नवनाथ कांबळे, सौ. मोहिनी चिंचकर व ग्रामस्थ उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!