तालुक्यातील मातंग समाज काँग्रेसच्या पाठीशी उभा राहणार; कार्यकर्त्यांचा निर्धार


फलटण तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्रीमती इंदुताई कानिफ घोलप

स्थैर्य, फलटण दि.08 : फलटण तालुका महिला काँग्रेसच्या उपाध्यक्षपदी श्रीमती इंदुताई कानिफ घोलप यांची हॉटेल आर्यमान येथे झालेल्या बैठकीत निवड करण्यात आली. सदर निवडीमुळे आगामी काळात तालुक्यातील सर्व मातंग समाज राष्ट्रीय काँग्रेसच्या पाठीशी ठामपणे उभा राहणार असल्याचा निर्धार उपस्थित लहू शक्ती सेनेच्या कार्यकर्त्यांनी व्यक्त केला.

यावेळी फलटण तालुका राष्ट्रीय काँग्रेसचे अध्यक्ष महेंद्र सूर्यवंशी – बेडके, सातारा जिल्हा काँग्रेसचे कार्यकारिणी सदस्य शरद नाळे, शहराध्यक्ष पंकज पवार, अजिंक्य कदम, सोपानराव जाधव यांच्यासह फलटण तालुक्यातील मातंग समाजातील प्रमुख कार्यकर्ते रामभाऊ पाटोळे, आनंद भिसे, सचिन खुडे, राजेंद्रभाऊ भिसे, निलेश बागाव, विजय बागाव, राजाभाऊ भिसे, संजय घोलप, संतोष भिसे, बापू भिसे, सचिन ननावरे, बाळासोा बागाव, कविता भिसे, रोहिणी फाळके, उमा सपकाळ आदींची उपस्थिती होती.

या निवडीनंतर श्रीमती इंदुताई घोलप यांचा राष्ट्रीय काँग्रेसच्यावतीने महेंद्र सूर्यवंशी – बेडके यांच्या हस्ते सत्कार संपन्न झाला. सत्काराला उत्तर देताना, राष्ट्रीय काँग्रेसच्या माध्यमातून मिळालेल्या संधीतून फलटण तालुक्यात काँग्रेस पक्ष आणखीन बळकट करण्यासाठी आपण प्रयत्नशील राहणार असून, मातंग समाजाच्या उन्नतीसाठी भरीव कार्य करण्याचा आपला मानस असल्याचे श्रीमती इंदूबाई घोलप यांनी सांगीतले.


Back to top button
Don`t copy text!