
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. २९ मार्च २०२३ | फलटण |
पळशी (ता. कोरेगाव) चे रामभक्त श्री. बाळासाहेब गायकवाड (वय ८६) यांचे सोमवार, दि. २७ मार्च २०२३ रोजी वृद्धापकाळाने निधन झाले. ते महाराष्ट्र पोलिस दलातून पोलिस उपनिरीक्षक या पदावरून निवृत्त झाले होते.
गायकवाड यांचे मूळ गाव पळशी, ता. कोरेगाव हे आहे. तेथे त्यांचे खाजगी राममंदिर आहे. ते एक रामभक्त व्यक्तिमत्त्व होते. प्रत्येक रामनवमी उत्सव ते साजरा करत होते. त्यांच्या मागे २ मुले, एक मुलगी, सुना, नातवंडे असा परिवार आहे.
त्यांचा दशक्रिया विधी दि.२९ मार्च २०२३ रोजी पळशी येथे सकाळी १०.०० वाजता झाला.
