
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 16 एप्रिल 2024 | फलटण | माढा लोकसभा मतदारसंघाचे भारतीय जनता पार्टीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी आज आपला लोकसभेसाठीचा उमेदवारी अर्ज प्रचंड शक्ती प्रदर्शन करीत दाखल केला आहे. यावेळी आमदार संजयमामा शिंदे, जयकुमार गोरे शहाजीबापू पाटील यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
रणजितसिंह नाईक निंबाळकर व राम सातपुते यांनी संयुक्तिक रॅली काढत आपला उमेदवारी अर्ज आज सोलापूर येथील जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये दाखल केला आहे. यावेळी रॅलीची सांगता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या जाहीर सभेने झाली.
