
दैनिक स्थैर्य । 7 मे 2025। फलटण । खासदार धैर्यशील मोहिते – पाटील आज बुधवार दि. 7 रोजी फलटण दौर्यावर आहेत. ते आज दिवसभर फलटणच्या पूर्व भागाचा दौरा करणार आहेत. त्यांचे फलटणमध्ये विविध कार्यक्रम होणार आहेत.
खासदार धैर्यशील मोहिते पाटील हे सकाळी 11 वाजता मुंजवडी येथे हनुमान मंदिर येथे उपस्थित राहणार आहेत. याठिकाणी कार्यकर्त्यांशी संपर्क साधणार आहेत. त्यानंतर दुपारी 12 वाजता आसू येथील शिवछत्रपती पुरस्कार प्राप्त खेळाडू वैष्णवी विठ्ठल फाळके यांच्या निवासस्थानी येणार आहेत. याठिकाणी वैष्णवी फाळके हिचा खासदारांच्या हस्ते सत्कार आयोजित करण्यात आला आहे. दुपारी 1 वाजता पवारवाडी येथील जितेंद्र पवार यांच्या निवासस्थानी येणार आहेत.
त्याठिकाणी कार्यकर्त्यांशी संवाद साधणार आहेत. दुपारी 2 वाजता गोखळी येथे येणार आहेत. याठिकाणी डॉ. शिवाजीराव गावडे यांच्या निवासस्थानी पाटबंधारे अधिकार्यांशी निरा उजवा कालव्यासंदर्भात चर्चा करणार आहेत. दुपारी 3.30 वाजता विडणी येथे येणार आहेत. त्याठिकाणी राजेंद्र पवार यांच्या निवासस्थानी कार्यकर्त्यांची बैठक घेणार आहेत.
सायंकाळी 4.30 वाजता शासकीय विश्रामगृह फलटण येथे महाविकास आघाडीच्या पदाधिकार्यांची बैठक होणार आहे. त्यावेळी ते पदाधिकार्यांशी संवाद साधणार आहेत.