खासदार छत्रपती उदयनराजे भोसले श्रीमंत रामराजेंच्या भेटीला; जिल्हा बॅंकेबाबत फलटणमध्ये खलबते


दैनिक स्थैर्य | दि. ०८ नोव्हेंबर २०२१ | फलटण | भारतीय जनता पार्टीचे राज्यसभा खासदार छत्रपती श्रीमंत उदयनराजे भोसले हे विधान परिषदेचे सभापती श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या फलटण येथील ‘‘लक्ष्मी – विलास पॅलेस‘‘ निवासस्थानी दाखल झालेले आहेत.

सध्या सातारा जिल्ह्यामध्ये जिल्हा बँकेच्या निवडणुकीचे घमासान सुरू असताना खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी फलटण येथे श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या ‘‘लक्ष्मी – विलास पॅलेस‘‘ या निवासस्थानी येवुन भेट घेतल्याने राजकीय वर्तुळात विविध चर्चांना उधाण आलेले आहे.

याबाबत खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांनी छेडले असता त्यांनी प्रतिक्रिया देण्यास नकार दिला.


Back to top button
Don`t copy text!