
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा

स्थैर्य, कातरखटाव, दि. २८ : बनपुरी (ता. खटाव) येथील माजी सरपंच मोतिराम कृष्णा देवकर ( वय ८५ ) यांचे वृध्दापकाळाने निधन झाले.
त्यांच्या पश्च्यात दोन मुलगे, दोन मुली, सुना-नातवंडे, पुतणे असा परिवार असून बनपुरी हायस्कुलचे संस्थापक संचालक होते. त्यांच्यावर सातारा येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरु असताना त्यांचे निधन झाले. कातरखटाव येथील मधुकर पाटील सांस्कृतिक भवनचे मालक तसेच शिवगंज (जि. शिरोही राजस्थान) येथील गलाई व्यवसायीक मधुकर देवकर, अजित देवकर यांचे वडील तर सरपंच रामभाऊ देवकर-पाटील यांचे चुलते होत.
