मोहनराव नाईक निंबाळकर व भोजराज नाईक निंबाळकर यांचा सत्कार संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. २४ नोव्हेंबर २०२१ । फलटण । कै.विठ्ठलराव राजेजीराव नाईक निंबाळकर यांचे सुपुत्र मोहनराव नाईक निंबाळकर व भोजराज नाईक निंबाळकर या दोघा बंधूंचा येथील मोहीम प्राणायाम व योगासन वर्ग व प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विद्यालय, फलटण शाखेच्यावतीने सत्कार संपन्न झाला.

मोहनराव नाईक निंबाळकर यांची नुकतीच श्रीमंत रामराजे सहकारी मोटार वाहतूक संस्थेच्या संचालकपदी बिनविरोध निवड झाली असून भोजराज नाईक निंबाळकर यांची लायन्स क्लबच्या उपप्रांतपाल, डिस्ट्रीक्ट गव्हर्नर पदावर बिनविरोध झाली आहे. सदर निवडीबद्दल या दोघा बंधूंचा मोहीम प्राणायाम व योगासन वर्ग फलटणचे सर्व सभासद तसेच मुधोजी क्लब रिंग टेनिस ग्रुपचे सभासद, प्रजापिता ब्रम्हाकुमारी ईश्‍वरीय विद्यालय, फलटण शाखेच्या संचालिका बी.के.छायादिदी व बी.के. अनितादिदी यांच्या हस्ते हा सत्कार समारंभ संपन्न झाला.

मुधोजी क्लबच्या मैदानावर पार पडलेल्या या कार्यक्रमास संयोजक संस्थांचे पदाधिकारी, सभासद उपस्थित होते.


Back to top button
Don`t copy text!