जिओची जाहिरात करणारे मोदी एकमेव पंतप्रधान; नवज्योतसिंग सिद्धूंची सडकून टीका

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

 


स्थैर्य, नवी दिल्ली, दि.१७:  केंद्राने लागू केलेल्या तीन कृषी कायद्यांविरोधात गेले 21
दिवस शेतकरी आंदोलन करत आहेत. या आंदोलनाचा आज 22 वा दिवस आहे. या दरम्यानच
काँग्रेसचे नेते नवज्योत सिंह सिद्धू यांनी केंद्रातील नरेंद्र मोदी
सरकारवर कठोर टीका केलीय. त्यांनी मोदी सरकारला कॉर्पोरेटधार्जिणं सरकार
म्हटलं आहे. तसेच जो कुणी मोदी सरकारला विरोध करेल त्याला थेट देशद्रोही
म्हटलं जातंय. ही आपल्या भारतीय संविधानाची लढाई आहे. हे देशाचे
जाती-धर्माच्या नावावर विभाजन करु इच्छित आहेत, असंही नवज्योत सिंह सिद्धू
यांनी म्हटलं आहे.

या वक्तव्याचा व्हिडीओ नवज्योत सिंह सिद्धू यांनी सोशल मीडियावर शेअर
केला आहे. त्यांनी म्हटलंय की, मोदी सरकारने सगळे फायदे केवळ
धनदांडग्यांसाठी केले आहेत. देशातल्या सरकारी कंपन्या संपवण्यात आल्या
आहेत. बीएसएनएलचं उदाहरण घ्या. मी आतापर्यंत असा पंतप्रधान बघितलेला नाहीये
जो जिओ धन धना धन सोबत जाहिरात करतोय. दुसरीकडे बीएसएनएल या सरकारी
कंपनीला वार्षिक आठ हजार कोटींचं नुकसान सहन करावं लागतंय. जिओ एका वर्षात
900 कोटी रुपये कमावत आहे, असंही त्यांनी म्हटलंय.

पुढे सिद्धू यांनी म्हटलंय की, ओएनजीसी या सरकारी
कंपनीकडे एक लाख कोटी रुपयांचा अधिक निधी उपलब्ध होता. रिलायन्सने
ओएनजीसीकडून 11 हजार कोटी रुपयांचे तेल चोरलं आहे. शाह कमिटी बनली.
याबाबतीत सुप्रीम कोर्टाने रिलायन्सने ओएनजीसीचे 11 हजार कोटी रुपये परत
करण्याचे आदेश दिले आहेत. ते पैसे आजपर्यंत परत मिळालेले नाहीयत, असंही
सिद्धू यांनी म्हटलंय.

मनमोहन सिंह सरकारने शेतकऱ्यांचं 72 हजार कोटी
रुपयांचे कर्ज माफ केलं होतं. आपण दावा केला होता की शेतकऱ्यांचे उत्पन्न
दुप्पट करणार. ते दुप्पट झालं का? मात्र दुसरीकडे मोदी सरकारने गेल्या
वर्षी धनदांडग्यांचे साडेतीन लाख कोटींचं कर्ज माफ केलं. खासगी विमान
कंपन्यांनी सरकारी विमान कंपन्यांची जागा घेतलेली आहे. या कंपन्यांच्या
माध्यमातून मोठी लूट केली जातीय. पीक खराब झालं तर शेतकऱ्यांना त्याचा
परतावाही कमी किंमतीचा दिला जातो. यामुळे शेतकऱ्यांचीच नव्हे तर सरकारी
खजान्याचीही  लूट होत आहे. अशीही टीका नवज्योत सिंह सिद्धू यांनी केली आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!