आमदार सचिन पाटील यांच्या मागणीला यश; फलटण-आदमापूर बससेवा अखेर सुरू

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

स्थैर्य, फलटण, दि. १४ ऑगस्ट : फलटण-कोरेगाव विधानसभा मतदारसंघातील भाविकांची अनेक दिवसांपासूनची मागणी असलेल्या फलटण-आदमापूर बससेवेला आमदार सचिन पाटील यांच्या यशस्वी पाठपुराव्यामुळे अखेर मंजुरी मिळाली आहे. या मागणीसाठी कोळकी येथील युवा नेते उदयसिंह निंबाळकर आणि प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शिवलाल गावडे यांनी आमदार पाटील यांचे पत्र विभागीय नियंत्रकांना दिले होते.

फलटण तालुक्यातील संत बाळूमामांच्या दर्शनासाठी आदमापूरला जाणाऱ्या भक्तांची संख्या मोठी असून, त्यांच्या सोयीसाठी एसटी बस सुरू करण्याची मागणी सातत्याने होत होती. आमदार सचिन पाटील यांनी या मागणीची दखल घेऊन केलेल्या सूचनेनुसार, फलटण आगाराने ही नवीन बससेवा सुरू केली आहे.

ही बस फलटण येथून दररोज पुसेगाव, औंध, पुसेसावळी, कराड, कोल्हापूरमार्गे आदमापूरला पोहोचेल.

ही बससेवा सुरू झाल्यामुळे संत बाळूमामांच्या भाविक भक्तांमधून समाधान व्यक्त होत असून, त्यांनी या मागणीची दखल घेऊन ती पूर्ण केल्याबद्दल आमदार सचिन पाटील यांचे आभार मानले आहेत.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!