
थेट WhatsApp वर मिळवा
आमदार सचिन पाटील यांनी ठाकूरकी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळत श्री पद्मावती मंदिर परिसरात सात पोल आणि दिव्यांची सोय केली आहे. या निर्णयामुळे ग्रामस्थांनी समाधान व्यक्त केले आहे.
स्थैर्य, फलटण, दि. १५ ऑक्टोबर : आमदार सचिन पाटील यांनी ठाकूरकी ग्रामस्थांना दिलेला शब्द पाळत ग्रामदैवत श्री पद्मावती मंदिर परिसरात स्वतःच्या फंडातून सात पोल आणि दिव्यांची व्यवस्था केली आहे. नवरात्रीच्या निमित्ताने या दिव्यांचे काम पूर्ण झाल्याने परिसरातील नागरिकांमध्ये आनंदाचे वातावरण आहे.
अडचण सोडवण्याचे दिले होते आश्वासन
काही महिन्यांपूर्वी आमदार सचिन पाटील यांनी ठाकूरकी गावाच्या दौऱ्यादरम्यान श्री पद्मावती देवीचे दर्शन घेतले होते. त्यावेळी ग्रामस्थांनी मंदिर परिसरात वीज आणि दिव्यांची मागणी करत भक्तांची अडचण त्यांच्या निदर्शनास आणून दिली होती. यावर मंदिर परिसराचा विकास करण्यासाठी विशेष प्रयत्न करून निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन त्यांनी दिले होते.

ग्रामस्थांकडून विशेष सत्कार
माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार पाटील यांनी दिलेला शब्द पाळला. दिव्यांची व्यवस्था पूर्ण झाल्यानंतर आमदार पाटील यांच्या हस्ते देवीची महाआरती करण्यात आली. यावेळी ठाकूरकी ग्रामस्थांच्या वतीने त्यांचा विशेष सत्कार करून आभार मानण्यात आले. याप्रसंगी परिसरातील नागरिक आणि महिला मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.





