
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य | दि. 2 जुलै 2023 | मुंबई | विधान परिषदेचे माजी सभापती व विद्यमान आमदार राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्यासह फलटण कोरेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार दीपक चव्हाण हे अजित पवारांच्या सोबत राजभवनामध्ये दाखल झाले असल्याचे खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
सध्या राज्याच्या राजकारणामध्ये मोठ्या उलथापालथ सुरू आहे. यामध्येच राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे सातारा जिल्ह्यातील जेष्ठ नेते श्रीमंत रामराजे नाईक निंबाळकर यांच्या समवेत आमदार दीपक चव्हाण हे अजित पवार यांना पाठिंबा देण्यासाठी राजभावनामध्ये दाखल झाले असल्याची खात्रीशीर माहिती सूत्रांकडून समोर येत आहे.
