
दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
थेट WhatsApp वर मिळवा
दैनिक स्थैर्य । दि. १३ ऑगस्ट २०२२ । सातारा । मंत्रीपदी नियुक्ती झाल्यानंतर मंत्री शंभूराज देसाई हे पहिल्यांदाच आज साताऱ्यात आले. यावेळी त्यांनी पोवई नाक्यावरील छत्रपती शिवाजी महाराज व महाराष्ट्राचे पाहिले मुख्यमंत्री स्व. यशवंतराव चव्हाण यांच्या पुतळ्यांना पुष्पहार घालुन अभिवादन केले.
याप्रसंगी जिल्हाधिकारी रुचेश जयवंशी, मुख्य कार्यकारी अधिकारी विनय गौडा, पोलीस अधिक्षक अजय कुमार बंसल यांच्यासह नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
