शेंद्रे येथे मायलेकास मारहाण सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार : चौघांवर गुन्हा


स्थैर्य, सातारा, दि.२२: सातारा तालुक्यातील शेंद्रे येथे मायलेकास मारहाण केल्याप्रकरणी चौघांवर सातारा तालुका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. सुरेश मोहिते, खाशाबा मोहिते, मनोज मोहिते, संतोष मोहिते अशी गुन्हा दाखल झालेल्याची नावे असून रात्री उशिरापर्यंत अटक झालेली नव्हती.

याबाबतची अधिक माहिती अशी की, हर्षद हणमंत जाधव (वय 22, रा. शेंद्रे, ता. जि. सातारा) हे खासगी नोकरी करतात. त्यांच्या घराचे वीज कनेक्शन कट केले होते. मात्र, त्यांनी बिल भरले असल्यामुळे कट केलेले कनेक्शन जोडून देण्यात यावे म्हणून शेजारीच राहणार्‍या सुरेश मोहिते यांच्या घरी गेले होते. यावेळी त्यांच्यात बाचाबाची झाल्यामुळे खाशाबा मोहिते, मनोज भीमराव मोहिते, संतोष हणमंत मोहिते या तिघांनी हर्षद यांना हात आणि लाथाबुक्क्यांनी मारहाण करत शिवीगाळ, दमदाटी केली. यावेळी मनोज मोहिते याने हर्षद यांच्या पायावर दगड फेकून मारला. यावेळी हर्षद यांची आई गीता यांना मनोज याने हाताने ढकलून दिले. यामध्ये गीता यांच्या गळ्यातील मंगळसुत्र तुटून कुठेतरी गहाळ झाले. याप्रकरणी हर्षद यांनी शनिवार, दि. 20 रोजी सातारा तालुका पोलीस ठाण्यात तक्रार दिल्यानंतर सुरेश मोहिते, खाशाबा मोहिते, मनोज भीमराव मोहिते, संतोष हणमंत मोहिते (रा. शेंद्रे, ता. सातारा) या चौघांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. रात्री उशिरापर्यंत यापैकी कोणालाही अटक झालेली नव्हती. अधिक तपास पोलीस हवालदार रामदास भोईटे तपास करत आहेत.


Back to top button
Don`t copy text!