एमजी मोटरने ‘एमजी सर्व्हिस ऑन व्हील्स’ लॉन्च केले


दैनिक स्थैर्य । दि. २२ सप्टेंबर २०२२ । मुंबई ।  एमजी मोटर इंडियाने ग्राहकांना त्यांच्या घरातच आरामात बसून कार दुरूस्ती आणि देखभाल सेवा देण्यासाठी एमजी सर्व्हिस ऑन व्हील्सची सुविधा आणली आहे. हा सेवा आऊटरीच उपक्रम ग्राहकांची सोय आणि सुलभता यांच्यासाठी वेगवान व अधिक कार्यक्षम सेवा देण्याच्या वचनबद्धतेला अधोरेखित करतो. या कार्यक्रमाचा पालयट प्रयोग राजकोटमध्ये करण्यात आला आणि कंपनी भविष्यात भारतातील देशांतर्गत बाजारपेठांमध्ये पोहोचण्याच्या योजना बनवत आहे.

‘एमजी सर्व्हिस ऑन व्हील्स’ ही विविध सेवांची श्रेणी आहे, जी ग्राहकांना त्यांच्या वाहनांची वेळोवेळी देखभाल करण्यास मदत करते आणि त्याचबरोबर त्यातून येणाऱ्या कोणत्याही दुरूस्ती आणि देखभालीच्या समस्याही सोडवते. त्यात अन्यथा वर्कशॉपमध्ये देण्यात येणाऱ्या इतर अनेक सेवा समाविष्ट करण्यात आल्या आहेत. हा उपक्रम एमजी सीमलेस कस्टमर सपोर्टच्या पाठिंब्याने पूर्णपणे प्रशिक्षित आणि प्रमाणित तंत्रज्ञांकडून सुसज्ज होऊन चालवला जाईल. यामुळे सेवा नेटवर्क विस्तारित होईल आणि विद्यमान बाजारपेठांमध्येही पोहोचू शकेल.

‘एमजी सर्व्हिस ऑन व्हील्स’ ही सेवा आवश्यक साधने, स्पेअर पार्टस् आणि इतर वापरयोग्य व डिजिटल साधनांनी सज्ज आहे. त्यातून तात्काळ आणि अकस्मात येणाऱ्या वाहन देखभालीच्या गरजा पूर्ण केल्या जातील. या प्रोग्रामला सुलभ आणि सहज अपॉइंटमेंट बुकिंग सिस्टिमशी जोडलेले आहे. त्यामुळे ग्राहकांना कंपनीशी जोडले जाऊन त्यांच्या कारच्या देखभालीच्या सेवा त्यांच्या सोयीने करणे शक्य होईल.

एमजी मोटर्सने यापूर्वी विविध ग्राहक केंद्री उपक्रम सुरू केले आहेत. त्यात ‘माय एमजी शील्ड’ आणि ‘एमजी केअर अॅट होम’ अशा उपक्रमांचा समावेश आहे. माय एमजी शील्ड हा एक खास आणि उद्योगातील आघाडीचा कार संरक्षण आणि सेवा उपक्रम आहे. एमजी केअर अॅट होम उपक्रम २०२१ साली सुरू झाला. त्याची रचना ग्राहकांना त्यांच्या दारात विनासंपर्क रिपेअर आणि सॅनिटायझेशन सेवा देण्यासाठी केली गेली आहे. त्यांच्या खास आणि विशेष सेवांच्या गौरवासाठी एमजी मोटरने जे. डी. पॉवर इंडिया कस्टमर सर्व्हिस इंडेक्स (सीएसआय) २०२१ स्टडीमध्ये पहिला क्रमांक पटकावला आहे.


Back to top button
Don`t copy text!