
📢 सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या WhatsApp वर मिळवा
👉 Channel Join करा
दैनिक स्थैर्य | दि. २० सप्टेंबर २०२३ | फलटण |
महाराष्ट्रामध्ये मराठा आरक्षण प्रश्न ऐरणीवर असताना महाराष्ट्रातील सर्व खासदारांची आज संध्याकाळी ८.०० वाजता दिल्लीतील ‘महाराष्ट्र सदन’ येथे सरकारने मराठा समाजाला आरक्षण द्यावे यासाठी सर्वपक्षीय बैठक आयोजित केली आहे. लवकरात लवकर मार्ग निघून मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे यासाठी ही बैठक आयोजित केली असल्याची माहिती खासदार रणजितसिह नाईक निंबाळकर यांनी सांगितले, अशी माहिती भारतीय जनता पार्टीचे प्रदेश सदस्य जयकुमार शिंदे यांनी दिली.
