शिष्यवृत्ती, शिक्षण व परीक्षा शुल्क प्रतिपूर्ती योजनेच्या अर्ज नोंदणीकरीता महाविद्यालयांची बैठक संपन्न


दैनिक स्थैर्य । दि. ०९ ऑक्टोबर २०२२ । सातारा । भारत सरकार मॅट्रिकोत्तर व शिक्षण शुल्क परीक्षा शुल्क प्रतिपुर्ती योजनेच्या अर्जांची नोंदणी  विहीत वेळेत होऊन विदयार्थ्यांना शैक्षणिक वर्षाकरीता लाभ मिळण्यासाठी महाडीबीटी पोर्टलवरुन नवीन व नुतनीकरणाच्या अर्जांची ऑनलाईन स्विकृती दि. 22 सप्टेंबर पासून सुरु करण्यात आलेली आहे.  याअनुषंगाने जिल्हयातील महाविद्यालयांच्या प्राचार्यांची बैठक सातारा येथे सहायक आयुक्त समाज कल्याण कार्यालय येथे आयोजित करण्यात आली.

यावेळी सहायक आयुक्त  नितिन उबाळे यांनी उपस्थित प्राचार्यांना जास्तीत जास्त पात्र मागासवर्गीय विद्यार्थ्यांना या योजनांच्या लाभासाठी अर्जांची नोंदणी होण्यासाठी मार्गदर्शन करुन आवश्यक त्या सूचना केल्या.     महाविद्यालयामध्ये स्थापन करण्यात आलेल्या समान संधी केंद्राद्वारे विदयार्थ्यांना ऑनलाईन अर्ज भरण्यास योग्य ती मदत करण्यात यावी, विद्यार्थ्यांना विहित कालावधीतच अर्ज भरण्याची कार्यवाही करुन घ्यावी.  यासाठी आवश्यक माहितीचे फ्लेक्स, होर्डींग महाविदयालयाच्या आवारामध्ये लावण्यात यावेत. महाविदयालयातील अनु.जाती, इमाव, विजाभज व विमाप्र प्रवर्गातील विदयार्थ्यांना विहीत कालावधीमध्ये ऑनलाईन अर्ज करण्याचे भित्तीपत्रके, विद्यार्थ्यांच्या व्हॉटस् ॲप ग्रुपद्वारे कळविण्यात यावे, अशा सुचना सहायक आयुक्त श्री. उबाळे यांनी उपस्थित प्राचार्यांना दिल्या.


Back to top button
Don`t copy text!