
दैनिक स्थैर्य | दि. २ सप्टेंबर २०२६ | फलटण |
डॉ. राजेंद्र रुपनवर यांच्या आत्महत्येप्रकरणी फलटण उपजिल्हा रुग्णालयातील वैद्यकीय अधीक्षक डॉ. लीला मदने यांना निलंबित करण्यात आले आहे. या घटनेनंतर डॉ. मदने फरार झाल्या आहेत. पोलिसांचे पथक त्यांचा शोध घेत आहे.
डॉ. मदने यांची चौकशी झाल्यानंतर याप्रकरणी नवीन कोणती माहिती समोर येणार व हे प्रकरण नेमके कोणत्या वळणावर जाणार, हे पाहणे आता महत्त्वाचे ठरणार आहे.
डॉ. मदने यांचे निलंबन झाले असले तरी केवळ अधिकारी बदलून प्रश्न सुटणार नाहीत. फलटण उपजिल्हा रुग्णालयातील कारभाराची निष्पक्ष, उच्चस्तरीय चौकशी करून दोषींवर कारवाई आणि पीडितांना न्याय मिळवून देण्याची मागणी नागरिकांमधून जोर धरत आहे. अन्यथा फलटणचे हे प्रमुख आरोग्य केंद्र ‘व्हेंटिलेटर’वरच राहण्याचा धोका आहे. याचा फटका गरजू रुग्ण आणि त्यांच्या नातेवाईकांना बसणार आहे.
