मेढा पोलिसांचा जुगार अड्ड्यावर छापा; सुमारे ५ लाख ३१ हजारांचा मुद्देमाल जप्त

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । मेढा पोलिसांनी जुगार अड्ड्यावर छापा मारून बारा जणांवर कारवाई करत सुमारे 5 लाख 31 हजारांचा मुद्देमान जप्त केला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, कुडाळ, ता. जावली गावच्या हद्दीत जाधव आळी येथील अमोल हनुमंत शिंदे यांच्या राहत्या घराच्या भिंतीच्या आडोशाला अमोल हनुमंत शिंदे वय 40, संजय शामराव दबडे वय 50, तुकाराम कोंडीबा कचरे वय 70 (तिघेही राहणार कुडाळ तालुका जावली), दत्तात्रय मारुती जांभळे वय 66, अशोक भानुदास जाधव वय 40, अतुल गौतम पाडागळे वय 36 (तिघेही राहणार भिवडी तालुका जावली), संपत नारायण बेलोशे वय 50, राहणार रुईकर तालुका जावली विजय धर्म शिर्के राहणार सोमवारी तालुका जावली हनुमंत वसंत महामुलकर राहणार दरे बुद्रुक तालुका जावली सचिन मोहन जाधव राहणार सोनगाव तालुका जावली विजय राजाराम धनावडे राहणार मेढा तालुका जावली रुपेश दीपक पवार राहणार उत्तरे तालुका वाई हे पैशावर जुगार खेळताना आढळून आले त्यांच्याकडून पाच लाख तीस हजार 932 किमतीचे जुगाराचे साहित्य, रोख रक्कम, मोबाईल फोन व मोटरसायकली हस्तगत करण्यात आल्या आहेत.


Back to top button
Don`t copy text!