
दैनिक स्थैर्य । दि. १५ नोव्हेंबर २०२२ । सातारा । पत्नी व मुलाने केलेल्या मारहाणीत एकाचा मृत्यू झाल्याची फिर्याद म्हसवड पोलीस ठाण्यात नोंदविण्यात आली आहे.
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, एक नोव्हेंबर रोजी दिवड, तालुका माण येथील राहत्या घरी किसन नारायण सावंत यांनी घरात सुरू असलेला टीव्ही बंद केल्याच्या कारणावरून त्यांना त्यांची पत्नी उषा किसन सावंत आणि मुलगा आदित्य किसन सावंत यांनी घरातील कळकाच्या दांडक्याने डोक्यात संपूर्ण अंगावर मारहाण करून तसेच लाथाबुक्क्यांनी मारहाण करून गंभीर जखमी केले. त्यांना उपचारासाठी ससून हॉस्पिटल पुणे येथे ऍडमिट केले असता उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली असून सपोनि भुजबळ अधिक तपास करीत आहेत.