दैनिक स्थैर्य | दि. ४ जुलै २०२४ | फलटण |
महाराष्ट्र शासनाची ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजने’चे फॉर्म फलटण शहरातील नागरिकांसाठी येणार असून जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा लाभ घ्यावा, असे आवाहन भाजपाचे फलटण शहराध्यक्ष अनुप शहा यांनी केले आहे.
अनुप शहा हे ४ जुलैपासून महिलांना या योजनेसाठी मोफत फॉर्म भरून देणार आहेत. ज्या महिलांना फॉर्म भरावयाचे असतील त्यांनी आधार कार्ड, रेशन कार्ड किंवा शाळा सोडल्याचा दाखला व फोटो या कागदपत्रांसह उपस्थित राहून फॉर्म भरायचा आहे.
या योजनेद्वारे महिलांना प्रत्येक महिन्याला १५०० रुपये मानधन प्राप्त होणार आहे. जास्तीत जास्त महिलांनी या योजनेचा फायदा घ्यावा, असे आवाहन शहा यांच्या माध्यमातून करण्यात आले आहे.