राममंदिर पायाभरणीसाठी वावरहिर्‍यातुन माती आयोध्येला रवाना


स्थैर्य , वावरहिरे , दि. २७: समस्त हिंंदुंचे पविञ श्रद्धास्थान असलेल्या आयोध्या येथील प्रभु  रामचंद्र यांच्या नव्याने बांधण्यात येणार्‍या राम मंदिराच्या ५ऑगस्ट रोजी होणार्‍या पायाभरणीसाठी  महाराष्ट्राचे कुलदैवतअसणार्‍या शंभु महादेवाच्या  पविञ भुमीतील अष्टलिंगापैकी  पविञ जल तीर्थक्षेञ  असणारे वावरहिरे ता, माण येथील श्री पाणलिंगाच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या पुण्यभुमीतील श्री पाणलिंग मंदिर,राम मंदिर,भैरवनाथ मंदिर येथील पविञ माती आयोध्येतील राम मंदिर पायाभरणी साठी आयोध्येला  रवाना करण्यात आली.गावचे सरपंच चंद्रकांत वाघ,उपसरपंच सुरेशराव काळे यांच्या हस्ते या पविञ मातीचे विधीवत पुजन करुन अखिल भारतीय बेरड,रामोशी समाज कृती समिती चे मार्गदर्शक श्री आप्पासाहेब चव्हाण यांच्याकडे ही माती सुपुर्त करण्यात आली.
सातारा जिल्हा हा शुरवीर,  स्वातंत्र्य विर, व सैनिकाचा जिल्हा आहे. या जिल्ह्य़ातील वर्धनगड या ठिकाणाहून माती कलश यात्रेची सुरुवात दि 24 रोजी झाली. दि 25 ला फलटण तालुका.  आज दि 26 रोजी यात्रा माण तालुक्यातील ऐतिहासिक वारसा लाभलेल्या वारुगड, महिमानगड, मलवडी,शिखर शिंगणापुर , मोही या तीर्थ ठिकाणाहून वावरहिरे गावी आली. कुकुडवाड येथून शुरवीर बाज्या बैजया यांच्या स्मारकातील माती ही आणली.देशातुन विविध ठिकाणाहुन माती कलश याञेच्या माध्यमातुन गोळा झालेले पविञ जल,पविञ माती  ची एतिहासिक नोंद रामजन्मभुमी मंदीर विस्वस्त मंडळ यांच्याकडे संग्रहित ठेवली जाईल  अशी माहिती रामोशी बेडर कृती समितीचे अध्यक्ष श्री मोहनराव मदने यांनी यावेळी दिली. या माती कलश याञेत धनाजी चव्हाण, विशाल जाधव, दत्ताञय मदने ,आप्पासो अवघडे,  नरवीर उमाजी नाईक मिञ मंडळातील सर्व सदस्य व ग्रामस्थ  उपस्थित होते.

Back to top button
Don`t copy text!