‘मन की बात’ रे‍डिओ कार्यक्रमाचे उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सामूहिक श्रवण


दैनिक स्थैर्य । दि. १९ जून २०२३ । नागपूर । प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या लोकप्रिय ‘मन की बात’ या रेडिओ कार्यक्रमाचा सामूहिक श्रवण सोहळा कोराडी येथील नैवद्यम नॉर्थस्टार हॉटेल मधील सभागृहात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थित आज सकाळी 11 वाजता पार पाडला. शेकडो नागरिकांनी अतिशय शांततेने प्रधानमंत्र्यांचा संदेश सामूहिकरित्या ऐकला.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या महाराजबाग परिसरातील प्रशासकीय कार्यालयात छत्रपती शिवाजी महाराजांच्या सिंहासनारूढ पुतळ्याच्या भूमिपूजनाला उपस्थिती लावली होती. त्यानंतर त्यांनी कोराडी येथे ‘मन की बात’ कार्यक्रमात सहभाग घेतला. यावेळी त्यांच्यासोबत आमदार चंद्रशेखर बावनकुळे, आमदार प्रविण दटके, आमदार टेकचंद सावरकर यांची उपस्थिती होती.


Back to top button
Don`t copy text!