मसापच्या शाहूपुरी शाखेचे साहित्य पुरस्कार जाहीर; व. वा. बोधे यांना ‘ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता पुरस्कार’


महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) शाहूपुरी शाखेतर्फे दुसऱ्या वर्षाचे साहित्य पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, लवकरच एका विशेष सोहळ्यात मान्यवरांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण केले जाणार आहे.

स्थैर्य, सातारा : सातारच्या साहित्य क्षेत्राला संजीवनी देणाऱ्या आणि गेल्या १५ वर्षांपासून विविध दर्जेदार उपक्रम राबवणाऱ्या महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या (मसाप) शाहूपुरी शाखेतर्फे देण्यात येणारे दुसऱ्या वर्षाचे साहित्य पुरस्कार नुकतेच जाहीर करण्यात आले आहेत. सातारा जिल्ह्यातील उत्तम साहित्यकृतींना हे पुरस्कार दिले जातात. या पुरस्कारांचे वितरण लवकरच विविध मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे.

जाहीर झालेले पुरस्कार आणि विजेते साहित्यिक :

  • श्री. छ. थोरले प्रतापसिंह महाराज ज्येष्ठ साहित्यिक कृतज्ञता पुरस्कार : ज्येष्ठ साहित्यिक व. वा. बोधे.

  • विशेष साहित्य पुरस्कार : रवींद्र बेडकिहाळ (बाळशास्त्री जांभेकर यांच्या जीवनचरित्र आणि साहित्यावर लिहिलेल्या पुस्तकाबद्दल).

  • बेबीताई कांबळे चरित्र पुरस्कार : डॉ. पी. एन. शिंदे (पुस्तकाचे नाव – ‘शंभूपुत्र छत्रपती थोरले शाहू महाराज’).

  • प्रा. अजित पाटील कथा पुरस्कार : सुभाष गुरव (कथासंग्रह – ‘ठिणग्या’).

  • बा. सी. मर्ढेकर कविता पुरस्कार : रामकली पावसकर (कवितासंग्रह – ‘नीरव किनाऱ्यावर’).

  • वासंती मुजुमदार संकीर्ण साहित्य पुरस्कार : ॲड. सीमंतीनी नुलकर (पुस्तक – ‘फुलाचे जंगली प्रदेश’).

  • रा. ना. चव्हाण वैचारिक ग्रंथ पुरस्कार : ॲड. शंकर निकम (पुस्तक – ‘गैरसमजाच्या विळख्यातील नेहरु’).

पुरस्काराचे स्वरूप

रोख रक्कम, शाल आणि सन्मानचिन्ह असे या सर्व पुरस्कारांचे स्वरूप आहे.

लवकरच एका विशेष सोहळ्याचे आयोजन करून मान्यवरांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात येतील, अशी माहिती मसाप शाहूपुरी शाखेचे अध्यक्ष नंदकुमार सावंत, उपाध्यक्ष विक्रम पाटील, कार्याध्यक्ष ॲड. चंद्रकांत बेबले, प्रमुख कार्यवाह अजित साळुंखे, कार्यवाह संजय माने, कोषाध्यक्ष सचिन सावंत आणि शाहूपुरी शाखेच्या सर्व सदस्यांनी दिली आहे.


Back to top button
Don`t copy text!