झेंडूच्या दरात मोठी घसरण; शेतकर्‍यांचा उत्पादन खर्चही निघेना, नवरात्रीत शेतकरी संकटात

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा ›

नवरात्रोत्सवाच्या काळात झेंडूच्या फुलांच्या दरात प्रचंड घसरण झाल्याने शेतकर्‍यांचा लागवड, खते आणि तोडणीचा खर्चही निघणे कठीण झाले आहे.

स्थैर्य, सातारा, दि. १२ ऑक्टोबर : नवरात्रोत्सव आणि आगामी दसऱ्याच्या सणाच्या पार्श्वभूमीवर बाजारपेठेत झेंडूच्या फुलांची आवक मोठ्या प्रमाणावर वाढली आहे. मात्र, मागणीच्या तुलनेत आवक जास्त झाल्याने झेंडूच्या बाजारात दराची मोठी घसरण झाली आहे. यामुळे फुलांची लागवड, खते, फवारणी आणि तोडणीसाठी झालेला खर्चही वसूल होत नसल्याने शेतकरी आर्थिक अडचणीत सापडले आहेत.

उत्पादन खर्चाचा ताळमेळ बिघडला

सणासुदीच्या काळात झेंडूच्या फुलांना चांगला भाव मिळेल या आशेने शेतकर्‍यांनी मोठ्या प्रमाणावर झेंडूची लागवड केली होती. मात्र, घाऊक बाजारात ५ ते १५ रुपये प्रति किलो असा अत्यल्प दर मिळत असल्याने शेतकर्‍यांचा तोडणी आणि वाहतुकीचा खर्चही निघणे अशक्य झाले आहे. अनेक ठिकाणी शेतकरी माल बाजारात आणण्याऐवजी शेतातच सोडून देण्याची वेळ आली आहे.

शेतकऱ्यांवर आर्थिक संकट

हवामानातील बदलांमुळे आधीच पिकांवर रोगांचा प्रादुर्भाव झाला होता, त्यासाठी औषध फवारणीचा खर्च वाढला होता. त्यातच आता बाजारात मिळालेल्या अल्प दरामुळे भांडवली खर्चही निघत नसल्याने शेतकरी वर्ग हवालदिल झाला आहे. प्रशासनाने आणि शासनाने शेतकर्‍यांच्या या नुकसानीची दखल घेऊन योग्य मदत करावी, अशी मागणी शेतकर्‍यांकडून केली जात आहे.

 

 

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!