दैनिक स्थैर्य | दि. 11 जानेवारी 2025 | फलटण | माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवत युवा उद्योजक उमेश उमेश तानवडे यांच्यासह राजे गटातील विविध पदाधिकाऱ्यांनी भारतीय जनता पार्टीमध्ये माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे.
आगामी काळामध्ये भारतीय जनता पार्टी व माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्यामाध्यमातून पक्ष वाढीसाठी कामकाज करणार असल्याची ग्वाही यावेळी युवा उद्योजक उमेश तानवडे यांनी दिली.
उमेश तानवडे यांच्यासोबत, शंतूल नांगरे – पाटील, जाधववाडी येथील सौरभ सस्ते, शुभम जाधव यांनी सुद्धा भारतीय जनता पार्टीमध्ये जाहीर प्रवेश केला आहे. यावेळी महाराजा मल्टिस्टेटचे व्हाईस चेअरमन रणजितसिंह भोसले यांची प्रमुख उपस्थिती होती.