रेशनकार्डला आधार लिंक करणे बंधनकारक; ३१ ऑक्टोबर शेवटची तारीख

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now


दैनिक स्थैर्य | दि. २४ ऑक्टोबर २०२४ | फलटण |
स्वस्त धान्य दुकानातून रेशन घेणार्‍या शिधापत्रिकाधारकांना रेशन कार्डची आधार कार्डाशी जोडणी करणे बंधनकारक करण्यात आले आहे. येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत लाभार्थ्यांना आधार जोडणी करावी लागणार आहे.

यानंतर ज्या लाभार्थ्यांचे रेशन वितरण प्रणालीशी आधार जोडणी नसेल त्यांचे रेशन बंद करण्याच्या सूचना देण्यात आलेल्या आहेत. यामुळे लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात जाऊन आधार जोडणी करून घ्यावी, असे आवाहन पुरवठा अधिकारी सविता चौधर यांनी केले आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत तांदळासह धान्य वितरण करण्यात येते. या योजनेचा लाभ घेणार्‍या शिधापत्रिकाधारकांना आता सरकारने ई-केवायसी करण्यासाठी सांगितले आहे.

ज्या लोकांनी आधार लिंक केले नाही, अशा लाभार्थ्यांचे रेशन कार्ड रद्द करण्यात येणार आहे. राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेअंतर्गत बनावट लाभार्थी धान्याचा लाभ घेत असल्याचे उघड झाले आहे. या लाभार्थ्यांचे रेशन बंद करण्यासाठी सरकारने आधार लिंक करण्याची प्रक्रिया सुरू केली आहे.

राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेमधील केशरी आणि पिवळ्या रेशन कार्डधारकांना ३१ ऑक्टोबरपर्यंत रेशन कार्डशी आधार लिंक करणे आवश्यक आहे. जून महिन्यात आधार लिंक करण्यासाठी पुरवठा खात्याकडून विशेष मोहीम सुरू करण्यात आली होती, परंतु, पुरवठा विभागाच्या डेटा सेंटरमध्ये पावसाचे पाणी घुसल्यामुळे आधार लिंक करणे शक्य झाले नाही.

रेशन कार्ड होणार बंद
अन्न सुरक्षा योजनेत बोगस रेशनकार्डधारकांचा शोध घेण्यासाठी आधार लिंक करणे बंधनकारक करण्यात आलेले आहे. रेशन कार्डाशी बायोमेट्रिक पडताळणी झाली नसेल तर अशा लाभार्थ्यांचे रेशन आधार लिंक करावे. वरिष्ठ कार्यालयाकडून आलेल्या सुचनेनुसार, येत्या ३१ ऑक्टोबरपर्यंत शिधापत्रिकेशी आधार लिंक करण्याची मुदत देण्यात आलेली आहे. लाभार्थ्यांनी स्वस्त धान्य दुकानात ई-पॉस यंत्राद्वारे आधार लिंक करून घ्यावे.

ई-केवायसी करणे का गरजेचे

  • अनेक मजूर आपल्या उपजीविका भागवण्यासाठी कामाला जातात. अशा लाभार्थ्यांना रेशन मिळणे कठीण होते. मजुरांच्या बोटांचे ठसे लागत नाहीत किंवा रेशनकार्ड केवायसी होत नाही, असे कारण सांगून स्वस्त धान्य दुकानदार रेशनच देत नाहीत.
  • या अडचणीतून लाभार्थ्यांना बाहेर काढण्यासाठी आधार लिंक करण्याची प्रक्रिया राबविण्यात येत आहे. रेशन दुकानातील ई-पॉस यंत्रावर बोटाचे ठसे किंवा डोळे स्कॅन केल्यानंतर आधार जोडणीची प्रक्रिया पूर्ण करता येणार आहे.


Back to top button
Don`t copy text!