लोखंडी गेटचे रेलिंग तोडणार्‍या एकाला अटक

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

दैनिक स्थैर्य । दि.०१ एप्रिल २०२२ । सातारा । कृष्णा नगर वसाहतीजवळ सिंचन विभागाच्या शाखा कार्यालयाचे लोखंडी गेट आणि रेलिंग लोखंडी वस्तूने तोडून चोरी करण्याचा प्रयत्न करणाऱ्या तिघांपैकी एकाला शहर पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. राजेश जाधव प्रतापसिंह नगर असे त्याचे नाव आहे. त्याच्याबरोबर त्याचे दोन साथीदार पळून गेल्याने ते पोलिसांच्या हाती लागले नाही. याप्रकरणी ऋतुजा गौरव कदम वय 34 रा. दौलत नगर सातारा यांनी शहर पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार मंगळवारी दुपारी पावणे चारच्या दरम्यान दोन ते तीन अज्ञात इसम शाखा कार्यालयाच्या प्रवेशद्वाराचे लोखंडी गेट आणि रेलिंग तोडून घेऊन जात असल्याचे आढळून आले. फिर्यादीने संबंधितांना विचारणा केली असता त्यातील दोन इसम तेथून पळून गेले. तेथील कर्मचाऱ्यांनी तात्काळ 112 क्रमांकाला फोन केला असता पोलिस तेथे हजर झाले याप्रकरणी राजेश जाधव या एका इसमाला ताब्यात घेण्यात आले आहे. पोलीस हवालदार जाधव अधिक तपास करत आहेत.

Back to top button
Don`t copy text!