धनगरवाडीत मालट्रकला आग

ताज्या बातम्यांसाठी दैनिक "स्थैर्य"चा ग्रुप जॉईन करा
WhatsApp Group Join Now
Google News Join Now

स्थैर्य, खंडाळा, दि.२१: धनगरवाडी गावच्या हद्दीमध्ये कापूस भरुन निघालेल्या मालट्रकला अचानकपणे लागलेल्या आगीमध्ये मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. दरम्यान, शिरवळ पोलीसांनी दाखविलेल्या सतर्कतेमुळे एशियन पेंटस व गोदरेज लाँकीम कंपनीच्या अग्निशमन बंबांच्या सहकार्यामुळे मोठ्या प्रमाणात हानी टळली.

याबाबतची घटनास्थळावरुन मिळालेली माहिती अशी कि, गुजरातकडे कापूस भरुन निघालेल्या मालट्रक (क्रं. एचआर-38- डब्ल्यू-7167) हा धनगरवाडी गावच्या हद्दीत आला असता एका ठिकाणी महामार्गालगत चालकाने संबंधित मालट्रक लावला. यावेळी काहीवेळानंतर संबंधित मालट्रकच्या पाठीमागील बाजूकडून धूर येत असल्याचे ढाब्यावरील सुरक्षारक्षकाच्या निदर्शनास आले.

याबाबतची कल्पना शिरवळ पोलीस स्टेशनला मिळताच तत्काळ धाव घेते शिरवळ पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सागर अरगडे,सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक पांडुरंग हजारे, पोलीस हवालदार विलास इंगवले,विनोद पवार,नवनाथ कोळेकर, महिला पोलीस कर्मचारी सुप्रिया इंगवले,होमगार्ड जाधव यांनी तत्परता दाखवत मालट्रकमधील कापसाचे गठ्ठे बाहेर काढले.

यावेळी केसुर्डी एमआयडीसीमधील एशियन पेंटस व गोदरेज लाँकीम कंपनीच्या अग्निशमन बंबांच्या सहकार्याने मालट्रकला लागलेली आग आटोक्यात आणण्यात यश आले. यावेळी मालट्रकचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याचा अंदाज आहे.


प्रतिक्रिया व्यक्त करा

आपला ई-मेल अड्रेस प्रकाशित केला जाणार नाही. आवश्यक फील्डस् * मार्क केले आहेत

Back to top button
Don`t copy text!