फलटणमध्ये विद्युत स्मशानभूमी करा; नगरसेवक अशोकराव जाधव यांची मागणी

दैनिक स्थैर्य • WhatsApp Channel
सातारा जिल्ह्यातील ताज्या बातम्या
थेट WhatsApp वर मिळवा
WhatsApp Channel JOIN करा

स्थैर्य, फलटण, दि. २२ : फलटण शहरामध्ये सध्या अंत्यसंकरासाठी स्मशानभूमी कमी पडत असल्याने कोरोनाच्या काळात कोळकी ग्रामपंचायतीची रावरामोशी पुलाच्या जवळ असलेल्या स्मशानभूमीचा वापर करण्यात येत आहे. तरी आगामी काळात फलटण नगरपरिषदेची अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमी तयार करण्यात यावी. अशी मागणी फलटण नगरपरिषदेचे मुख्याधिकारी प्रसाद काटकर यांच्याकडे नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

सध्या फलटण शहरासह तालुक्यामध्ये कोरोना बाधित रुग्णांचे मृत्यू होण्याचे प्रमाण सध्या वाढलेले आहे. सध्या फलटण तालुक्यामधील कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. तरी यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यामध्ये नगरपालिकेचे कर्मचारी यांचे वेळ खूप जात आहे. तरी फलटण नगरपालिकेने विशेष सभा बोलावून अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव तातडीने घ्यावा व त्या संबंधित पावले नगरपालिकेने तातडीने उचलावीत, अशी मागणी नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

सध्या फलटण शहरात व तालुक्यात कोरोनामुळे दररोज मृत्यू होणाऱ्यांची संख्या हि साधारणपणे २० एवढी आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्यांवर फलटण नगर परिषदेचे कर्मचारी हे अंत्यसंस्कार करीत आहेत. त्या मुळे फलटण नगरपरिषदेच्या अंत्यसंस्कार करणाऱ्या कर्मचाऱ्यांची काळजी घेण्यासाठी फलटण नागरपालिकने अत्याधुनिक विद्युत स्मशानभूमीचा ठराव घेण्यासाठी विशेष सभा बोलवावी व ह्या ठरावास तातडीने प्रशासकीय मंजुरी सुद्धा देण्यात यावी, असेही नगरसेवक अशोकराव जाधव यांनी केलेली आहे.

Back to top button
Don`t copy text!