महात्मा फुले अध्यापक विद्यालयात विविध उपक्रमांनी विज्ञान दिन व मराठी राजभाषा दिवस साजरा…


दैनिक स्थैर्य । दि. ०१ मार्च २०२३ । मुंबई । प्रतिज्ञेमध्ये ‘भारत माझा देश आहे’ येथे आमचा असा शब्द वापरलेला नाही. घर आपलं असतं ते आपण स्वच्छ करायचे असते. रस्ता आमचा असतो तो आपणच स्वच्छ करायचा असतो, आपण विज्ञानाचे शिक्षण घेतले पण त्याचा व्यवहारिक उपयोग फारसा केला नाही म्हणूनच जागतिक स्पर्धेमध्ये आव्हाने पेलत असताना भारत देश विविध क्षेत्रात मागे पडलेला दिसून येतो. असे मत प्रा. डॉ. नंदकुमार धनवडे यांनी व्यक्त केले.

जागतिक विज्ञान दिवसानिमित्त रयत शिक्षण संस्थेच्या महात्मा फुले अध्यापक विद्यालयात प्रशिक्षणार्थी यांनी बनविलेला विज्ञानाची
विविध उपकरणे शैक्षणिक साहित्य तसेच गगन भरारी या हस्तलिखिताचे प्रकाशन करण्यात आले. आपण विज्ञानाची शिक्षण घेतले ध्वनी प्रदूषण हा घटक अभ्यासला परंतु विविध सण आणि उत्सव मिरवणुकांमध्ये डॉल्बीची तीव्रता श्रवण इंद्रियांना न सोसणारी असते खरंच आपण शिकलो का ? विज्ञानाचा आधार घेतला का ? चिकित्सा केली का ? याचा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही त्यामुळेच आपल्याकडे विज्ञानवाद व विवेकवाद निश्चितपणे तुलनेने कमी दिसून येतो. याउलट डेन्मार्क, स्वीडन, अमेरिका, जपान ही राष्ट्र विवेकावादामुळे अग्रेसर असल्याचे दिसून येते कारण त्या ठिकाणी विज्ञानाचे शिक्षण व पालक, विद्यार्थी यांच्याकडून त्याचा व्यवहारांमध्ये सातत्यपूर्ण वापर होत असतो यामुळे या राष्ट्रांनी सामाजिक आर्थिक व वैज्ञानिक क्षेत्रात प्रचंड प्रगती केल्याचे दिसून येते. निसर्ग वाचल्याशिवाय मानव वाचणार नाही मानव वाचल्याशिवाय समाज वाचणार नाही निसर्गाचा जरूर आधार घ्यावा पण त्याला ओरबाडून घेतले तर निसर्ग कोपतो याची प्रचिती नैसर्गिक आपत्तीमध्ये आपणास आलेले दिसून येते म्हणून निसर्गाची जपणूक करा  हे  माझं आहे ते वाचवले पाहिजे.

मराठी राजभाषा दिनानिमित्त कला, वाणिज्य महाविद्यालयाची प्रा. डॉ. भरत जाधव यांनी मातृभाषा आणि मातृभाषेतून रोजगाराच्या
विविध संधी कशा उपलब्ध होतात याविषयी सविस्तर मार्गदर्शन केले. प्रत्येकाने आपल्या मातृभाषेचा आदर केला पाहिजे जगामध्ये कुठेही अडचण येणार नाही आणि विद्यार्थी मातृभाषेतून उत्तम शिक्षण घेऊ शकतो याला मानसशास्त्राचा व शिक्षणतज्ञांचा आधार आहे प्रयोगाने ते सिद्ध झालेले आहे. म्हणूनच राष्ट्रीय शैक्षणिक धोरणामध्ये मातृभाषेतून शिक्षण  हे धोरण निश्चित केलेले आहे देश पुढे न्यायचा असेल तर आपल्यापरीने आपण प्रयत्न केले पाहिजेत त्यासाठी परदेशी भाषा फक्त उपयोगात आणून चालणार नाही तर मातृभाषा ही आपली जननी आहे त्याचा आदर, उपयोग त्या साहित्याचा प्रचार व प्रसार करणे आपला आद्य कर्तव्य आहे असे मत व्यक्त केले.  मराठी राजभाषा दिनानिमित्त विद्यार्थ्यांनी हस्तलिखित, भित्तिपत्रक, भेटकार्ड तयार केलेले होते. त्याचे उद्घाटन प्रा. डॉ.भरत जाधव यांच्या शुभहस्ते करण्यात आले विभाग प्रमुख प्रा. सोमनाथ शिंगाडे यांनी नियोजन केले. अध्यक्षीय मनोगत व्यक्त करत असताना अध्यापक विद्यालयाचे प्राचार्य उदयकुमार सांगली यांनी विज्ञानाचा उपयोग करत असताना समाज व राष्ट्र केंद्रबिंदू मानायला हवा विज्ञानाने सामान्यांचे जीवन व मानवी जीवन समृद्ध व्हावे असे मत व्यक्त केले. विज्ञान विषयाचे विभाग प्रमुख प्रा. रवींद्र घाटगे यांनी शैक्षणिक
साहित्याचे प्रदर्शन विद्यार्थ्यांच्या मदतीने भरविले सुनीता साबळे व विज्ञान मंडळातील सर्व सदस्य यांनी व्यवहारात व दैनंदिन जीवनात
उपयोगी पडणारे विविध शैक्षणिक साहित्य स्वतः तयार करून त्याचे प्रदर्शन भरविले होते. या कार्यक्रमाच्या प्रसंगी प्रा. प्रदीप हिवरकर, डॉ. दादासाहेब नवले, प्रा. ज्योती शिंदे  सर्व प्रशिक्षणार्थी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रांजल देशमाने व आभार ओंकार पवार यांनी केले.


Back to top button
Don`t copy text!