महात्मा फुले : एक विचार


वर्षोंवर्षे जखडलेल्या इथल्या समाजातील अन्यायाविरोधात क्रांती आणि आंदोलनातून विद्रोहाचे पाणी पेटवून, विभाजित, विस्कळीत, मानसिक गुलामीत सापडलेल्या बहुजन समाजाला समतेच्या एका धाग्यात गुंफून, बहुजनांना आपले खरे मित्र आणि शत्रू याची ओळख घालून, या वर्गाला शैक्षणिकदृष्ट्या सबळ बनवून, मनुवादी वर्चस्वाला खिंडार पाडल्याने अस्वस्थ झालेल्या अपप्रवृत्ती महात्मा फुले यांना आजही बदनाम करण्याचं काम करतात.

लेखणीतून अपप्रचार करत चुकीचा इतिहास वाचकांच्या माथी मरतात. महामानवांचा इतिहास काळवंडण्याचं काम यांच्याकडून वर्षोंवर्षे केलं गेलंय आणि ते आजही होतंय, यांच्या कार्यपद्धती अनेक आहेत, मात्र धोरण एकच, अर्थात महात्मा फुले यांचं महात्म्य यांनी कणभरही कमी होणार नसलं, तरीही हा वैचारिक रोग समाजात आजही आहे. या कामात दुर्दैवाने काही बहुजनही हातभार लावतात, ही मोठी शोकांतिका. महामानवांना समजून घेण्यासाठी त्यांना वाचावं आणि जगावं लागतं, नाहीतर प्रतिगामी विचारांचं विष पाजणार्‍या ‘व्हॉट्सअ‍ॅप युनिव्हर्सिटी’सारख्या अनेक संस्था समाजात कार्यरत आहेत.

अर्थात महात्मा फुले हा एक ‘विचाप्रवाह’ असून त्याला जेवढं बदनाम करण्याचा प्रयत्न होतो, तितका तो उठून उभा असतो. प्रतिगामी शक्तींच्या विरोधात पुरोगामी शाहू, फुले, आंबेडकर यांच्या अमृत विचारांची मशाल तेवत ठेवण्यासाठी एकसंघ होवून लढावं लागेल आणि आजच्या जयंतीनिमित्ताने हा संकल्प महामानवास खरी आदरांजली असेल.

– प्रतिक बनकर,
ढवळ, फलटण.
९११९४५३६०२


Back to top button
Don`t copy text!