
सांगलीत ’नीट’ चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाल्याने मुख्याध्यापकाने घेतला लेकीचा जीव; निर्दयी बाप अटकेत. ही बातमी वाचून मन सुन्न झालं.आयुष्यभर शिक्षण क्षेत्रात सेवा केल्या नंतर असे अमानुष , अमानवी कृत्य करणारा तथाकथित क्रुरात्मा मुख्याध्यापक हा माणुसकीला कलंक आहे. मानवता व गोरगरीब व हातावर श्रमावर पोट भरणार्या समाजातील आई वडील आणि मुलं आनंददायी जीवन जगत आहेत. पोटाची भुक शमली की, शांत झोपी जाणारा श्रमजीवी कष्टकरी शेतकरी कामगार शेतमजूर हे समाजातील श्रीमंत मनाचे आदर्श माता पिता आहेत.
समाजातील सधन,मध्यमवर्गीय, श्रीमंत समाजातील अनेक लोक भौतिक सुखाच्या मागे धावून अमाप सत्ता संपत्ती पैसा यांच्या अभिलाषेने स्वार्थांध झाले आहेत. या जीवघेण्या स्पर्धेला मर्यादा राहिली नाही.याची सुरवात नोकरी, बंगला,गाडी, गुंतवणूक व अधिक संपत्ती मिळवण्यासाठी पैसा मिळवण्यासाठी मिळेल त्या मार्गाने सत्ता संपत्ती भौतिक सुविधा साधन सामुग्री गोळा करण्यासाठी अहोरात्र कामाला लागतात. मग पैसा मिळवण्यासाठी अवैध, अनुचित, गैरमार्गाने लवकर श्रीमंत होण्यासाठी धडपडत चालू होते.अखेरीस मुलांना सुध्दा पैसे मिळवण्यासाठी मशीन सारखा उपयोग करतात.मुलाच्या इच्छा आशा अपेक्षा याचा यत्किंचितही विचार न करता कोचिंग क्लासला पाठवणे. कोचिंग क्लास मधील शिकविणारे व शिकणारे सारे पैसा आणि संपत्तीचे गलाम आहेत.आय.आय.टी.मेडीकल, इंजिनिअर, उच्च पदस्थ प्रशासनातील उच्च पदस्थ अधिकारी बनवणे यासाठी पालक भविष्यातील आर्थिक लोभापायी जीवाचा आटापिटा करतात.पालकांची मुलांना कोचिंग क्लासेस माध्यमातून भविष्यात पैसे कमावण्यासाठी एक एटीएम मशिन सारखा उपयोग करण्यासाठी किळसवाणी अतिरेकी घृणास्पद स्पर्धा सुरु होते.मुलांचे भावविश्वात मोठ्या प्रमाणात भावनांना कोंडमारा होतो. चुकून नीट सारख्या चाचणी परीक्षेत कमी गुण मिळाले तर चक्क जीवघेण्या स्पर्धेत मुलांचा बळी जातो. ही सामाजिक व शैक्षणिक, कौटुंबिक शोकांतिका आहे.
सांगली मधील घडलेल्या घटनेतून मानवता हरली व क्रुरता अभिलाषा जिंकली.अशी दयनीय अवस्था झाली आहे.कोचिंग क्लास व अमर्याद संपत्ती मिळवण्यासाठी मुंल मशीन सारखी कोचिंग क्लास मधून उच्च गुणवत्तेच्या फुगा फुगवून मेडिकल इंजिनिअरिंग आय आय टी इत्यादी अधिक धनाच्या अपेक्षा ठेवून उच्च शिक्षण देणारे तथाकथित संपत्ती,पैशाचे लालची वृत्तीचे निच लोक नीट चाचणीत कमी गुण मिळाले तर काय करतात हे जगासमोर आलं आहे.
आतातरी आत्मपरीक्षण सिंहावलोकन कोणी करणार आहे का? समाज अनुकरण प्रिय असतो.छोटा गरीब कष्टकरी श्रमजीवी शेतमजूर शेतकरी हा समाजातील उच्चभ्रू वर्गातील लोकांचे अनुकरण करताना दिसतो.म्हणून समाजातील जाणत्या नोकरदार, उच्च मध्यमवर्गीय श्रीमंत धनिक वर्गातील लोकांची जीवनशैली हि समाजाला मार्गदर्शक असली पाहिजे.पण दुर्देवाने उच्चभ्रू वर्गातील लोकांची जीवनशैली हि अनाकलनीय व विनाशाच्या उंबरठ्यावर उभी आहे. गोरगरीब, कष्टकरी श्रमजीवी शेतमजूर शेतकरी कामगार या वर्गातील लोकांची जीवनशैली साधी सोपी सहजसुलभ पध्दतीने वाढवलेली दिसते.हातावर पोट भरणारे छोटेमोठे कारागिर व्यावसायीक शेतमजूर यांच्या जीवनातील गरजा खुप कमी असल्याने जीवघेणी स्पर्धा नसते.
अशा सामाजिक वैविध्यपूर्ण पाश्र्वभूमीवर तथाकथित समाजातील ठेकेदार असलेल्या धनिक वर्गातील लोकांची पैशाच्या लोभापायी पोटच्या पोरांना पैसे मिळवणारी मशीन बनवणारी विकृत संस्कृतीला आणि घाणेरड्या मनोवृत्तीला समाजातून हद्दपार केले पाहिजे……!
लेखक:- अनिलकुमार बुवासाहेब कदम, (कवी लेखक साहित्यिक मुक्त पत्रकार)
उध्दव दमयंती निवास, गिरवी, ता. फलटण, जि. सातारा. मोबा. 8275214889