अखेर फलटणच्या गजानन चौकात बसवला महात्मा गांधींचा पुतळा; राष्ट्रीय काँग्रेसच्या प्रयत्नांना यश


दैनिक स्थैर्य । दि. ०२ ऑक्टोबर २०२२ । फलटण । दिनांक 2 ऑक्टोबर रोजी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती संपूर्ण देशामध्ये साजरी होत असते. फलटण शहरांमध्ये महात्मा गांधींचा एकमेव पुतळा गजानन चौक येथे होता त्यानंतर तेथील पुतळा हा जीर्ण झाल्याने नगर परिषदेच्या वतीने पुतळ्याचे सुशोभीकरण व पुतळा बदलण्याचे काम हाती घेण्यात आली परंतु काही कारणामुळे गजानन चौक येथील पुतळा बरीच वर्ष नगरपालिका बसू शकले नाही त्यावर राष्ट्रीय काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध वेळा विविध प्रकारे नगरपालिकेला निदर्शनास आणून देत आंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आला व त्यानंतर नुकतेच राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे कार्याध्यक्ष अमिर शेख यांनी नगरपालिकेच्या विरोधात कोर्टाचा असा इशारा दिल्यानंतर फलटण नगर परिषदेने गजानन चौक येथे महात्मा गांधींचा ध्यानस्थ असलेला पुतळा बसवला आहे.

फलटण शहरांमधील गजानन चौक येथे असणार्‍या पूर्वीचा पुतळा हा अतिशय उंच होता व त्यासोबतच महात्मा गांधी हे चालत चाललेले आहेत असे दिसत होते. परंतु आत्ता बसवण्यात आलेला पुतळ्याची चौथर्याची उंची कमी करून महात्मा गांधी ध्यानस्थ बसलेला पुतळा बसवण्यात आलेला आहे.


Back to top button
Don`t copy text!