महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त फलटण शहरात भव्य स्वच्छता अभियान

महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री जयंतीनिमित्त फलटण शहरात रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या मार्गदर्शनाखाली भव्य स्वच्छता मोहीम राबविण्यात आली.

स्थैर्य, फलटण, दि. ०२ ऑक्टोबर : राष्ट्रपिता महात्मा गांधी आणि लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीचे औचित्य साधून फलटण शहरात भव्य स्वच्छता अभियानाचे आयोजन करण्यात आले होते. रणजितसिंह नाईक निंबाळकर आणि आमदार सचिन पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील विविध प्रमुख भागांमध्ये ही मोहीम यशस्वीपणे राबविण्यात आली.

शहरातील ‘या’ भागात राबवले अभियान

नगराध्यक्ष समशेरसिंह नाईक निंबाळकर यांच्या आदेशाने आणि उपनगराध्यक्षा प्रियदर्शनी भोसले यांच्या सूचनेनुसार हे अभियान राबवण्यात आले. यामध्ये प्रामुख्याने महात्मा गांधी चौक, डेक्कन चौक ते महावीर स्तंभ, डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, रिंग रोड, माळजाई मंदिर परिसर आणि नगरपालिका परिसर या ठिकाणी स्वच्छता करण्यात आली.

अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचा सक्रिय सहभाग

या स्वच्छता अभियानाच्या यशस्वीतेसाठी मुख्याधिकारी निखिल जाधव आणि स्वच्छता व आरोग्य समितीचे सभापती सचिन अहिवळे यांनी विशेष मार्गदर्शन केले. त्यांच्या मार्गदर्शनाखाली नगरपालिकेचे सर्व अधिकारी, कर्मचारी, मुकादम आणि स्वच्छता निरीक्षक विनोद जाधव यांनी या अभियानात सक्रिय सहभाग नोंदवत मोहीम यशस्वी केली.

हे देखील वाचा

Back to top button
कॉपी करू नका..!